रविवार, मे 18, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सीनची गरज म्हणून दिग्दर्शकाने सुप्रसिद्ध अभिनेत्रीला सेटवरच लघवी करायला लावली अन्…; म्हणाली, “खूप आनंद झाला जेव्हा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 17, 2025 | 12:07 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actress Reveal Vash Director Seen

सीनची गरज म्हणून दिग्दर्शकाने सुप्रसिद्ध अभिनेत्रीला सेटवरच लघवी करायला लावली अन्…; म्हणाली, "खूप आनंद झाला जेव्हा…"

Actress Reveal Vash Director Seen : अभिनेत्री जानकी बोदीवाला यांनी अजय देवगन आणि आर माधवन स्टारर ‘शैतान’ या चित्रपटामधून स्वतःची ओळख निर्माण केली. मात्र आता ही अभिनेत्री एका वेगळ्याच वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने ‘वश’ या गुजराती चित्रपटातही काम केलं आहे. या चित्रपटाबाबतचा एक धक्कादायक अनुभव अभिनेत्रीने शेअर करताच अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अभिनेत्रीने गुजराती हॉरर फिल्म ‘वश’ बद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे, जो त्या चित्रपटाचा हिंदी रीमेक होता. ती म्हणाली की, दिग्दर्शक कृष्णदेव यग्निक यांनी एका सीनसाठी प्रत्यक्षात लघवी करु शकते की नाही याबाबत विचारणा केली. आणि मग तो सीन झाला की नाही याबद्दल अभिनेत्रीने उघडपणे सांगितले.

जानकी बोदीवाला हिने ‘फिल्मफेअर’ च्या मुलाखतीत त्या दृश्याबद्दल भाष्य केले, ज्यामध्ये तिचे पात्र आर्याला भूतबादा झालेली असते आणि एक वेळ अशी येते की ते भूत तिला लघूशंका करायला सुद्धा सोडत नाही त्यामुळे तिला तिथेच करावी लागते. जेव्हा दिग्दर्शकाने तिला प्रत्यक्षात लघवी होईल की नाही याबद्दल विचारले तेव्हा अभिनेत्रीने मान्य केले. जानकी म्हणाली, “मी गुजराती व्हर्जन केले. आणि मला तिथेही तोच सीन करावा लागला. आम्ही कार्यशाळा करत असताना दिग्दर्शकाने मला विचारले की तू खरोखर लघवीचा सीन करु शकतेस का? कारण त्याचा खूप मोठा प्रभाव पडेल आणि मी त्याबद्दल खूप आनंदी होते. एक अभिनेत्री असल्याने, मला पडद्यावर ते करण्याची संधी मिळत आहे. असे काहीतरी जे यापूर्वी कोणीही केले नाही”.

आणखी वाचा – “लगेच चिडली आणि…”, अमृता खानविलकरने नवऱ्याला केलेलं अनफॉलो, हिमांशू अखेर म्हणाला, “रागारागात तिने मला…”

View this post on Instagram

A post shared by Jb (@jankibodiwala)

जानकीने दिग्दर्शकाला एक चांगला माणूस म्हटले. तसेच, तिने त्या दृश्याबद्दल पुढे सांगितले की, तिच्या आणि दिग्दर्शकाच्या मते चित्रित करणे अशक्य आहे. अभिनेत्रीने सांगितले की, त्याच दृश्यामुळे तिने चित्रपट करण्यास सहमती दर्शविली कारण ती अभिनेत्री म्हणून वेगवगळे प्रयोग करुन पाहण्यास ती उत्साही होती. ती म्हणाली, ” “पण नंतर तो सीन करता आला नाही कारण त्यासाठी अनेक रिटेक घ्यावे लागले असते आणि सेटवर ते व्यावहारिकदृष्ट्या शक्य नव्हते. म्हणून आम्हाला तो करण्याचा एक मार्ग सापडला. मला आनंद झाला की मला खऱ्या आयुष्यात मी करु शकत नाही अशा सर्व गोष्टी मला करायला मिळाल्या. आणि तो सीन अक्षरशः माझा आवडता सीन आहे. आणि म्हणूनच मी त्या चित्रपटासाठी होकार दिला”.

आणखी वाचा – “भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

‘वश’ या चित्रपटात हितू कनोडिया, नीलम पांचाल आणि हितेन कुमार हे कलाकार दिसले होते. तर शैतान’ मध्ये अजय देवगन, ज्योतिका आणि आर माधवन यांच्यासह जानकी बोदीवाला झळकली. हा चित्रपट एका कुटुंबाची कहाणी आहे ज्यात एक आसुरी व्यक्ती घरावर बंधन ठेवते. आणि जानकी दोन्ही चित्रपटांमध्ये मुलीच्या भूमिकेत दिसली, ज्यात तिला त्या आसुरी व्यक्तीने अडकवून ठेवलेले असते अशावेळी तिचे वडील यांतून तिची सुखरुप सुटका करतात.

Tags: bollywood actressbollywood newsentertainment gossip
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Marathi Youth Clashesh With UP Cab Driver
Social

Video : युपी टॅक्सीचालकाला मराठी तरुणाने भररस्त्यात मारलं, तुम्हीच सांगा चुकी नक्की कोणाची?, उलट उत्तर अन्…

मे 17, 2025 | 7:00 pm
Actress mugdha shah after marriage struggle
Entertainment

२०शीत लग्न, गरोदरपणात सासूने घराबाहेर काढलं अन्…; ऋता दुर्गुळेच्या सासूबाईंच्या नशिबी वनवास, सासरीही छळ आणि…

मे 17, 2025 | 5:51 pm
Nimrit Kaur Ahluwalia Was Sexually Molested
Entertainment

नितंबांना स्पर्श केला, हात फिरवला अन्…; सर्वोच्च न्यायालयात सुप्रसिद्ध अभिनेत्रीसह धक्कादायक प्रकार, जवळ येण्याच्या प्रयत्नात…

मे 17, 2025 | 4:54 pm
Actress mugdha shah struggle after mother death
Entertainment

तीन महिन्यांची असताना आई गेली, वडिलांचं दुसरं लग्न, छळ अन्…; ऋता दुर्गुळेच्या सासूबाईंचा वाईट काळ

मे 17, 2025 | 4:07 pm
Next Post
yuvika chaudhary prince narula relationship

प्रिन्स नरुलाने बायकोची गर्भनाळ स्वतःच कापली अन्...; युविका चौधरी म्हणाली, “सी-सेक्शन पाहिलं, शूट करत...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.