Shabana Azmi Reveals Relationship : लोकप्रिय अभिनेत्री शबाना आझमी आणि गीतकार, पटकथा लेखक जावेद अख्तर हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. नुकतीच त्यांच्या लग्नाला ४० वर्षे पूर्ण झाली आहेत. शबाना आझमीने अलीकडेच पती जावेद अख्तर यांच्यासह लग्नाचा ४० वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या लग्नाला ४० वर्षे झाली आहेत. शबानाने नुकतेच एका मुलाखतीत त्यांचे लग्न आणि त्यातील चढ-उतार याविषयी भाष्य केलं आहे. शबानाने जावेदबरोबरच्या या मजबूत नात्याला मैत्रीचा आधार दिला. त्यांच्यातील मैत्रीमुळे हे नाते टिकले असल्याचं समोर आलं. याशिवाय तिने जावेद यांच्यासह नाते संपवण्याचा निर्णय घेतला होता याबाबतही भाष्य केला.
शबाना आझमी यांनी ‘रेडिओ नशा’शी बोलताना जावेद अख्तरच्या चांगल्या गुणाबद्दलही सांगितले. यावेळी बोलताना शबानाने त्यांची प्रेमकथाही सांगितली. अभिनेत्री यावेळी बोलली की, तिच्या आईने तिला कवी टाइप व्यक्तीशी लग्न न करण्याचा सल्ला दिला होता. शबाना आझमी म्हणाल्या, “माझ्या आईने मला सांगितले होते की, कवी मनाच्या व्यक्तीच्या जाळ्यात पडू नकोस. ते छान शब्द बोलतील आणि त्यात अडकवतील. आणि मी खरोखरच अडकले. मला माहित नाही की आमच्यापैकी कोणी पहिलं प्रपोज केले होते, पण आम्हाला एकमेकांशी बोलायला खूप आवडायचे. बाकी काही समजू शकले नाही”.
शबाना पुढे म्हणाली, “परिस्थिती कठीण असल्याने आम्ही एकदा आमचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला होता. तीन महिने आमचे बोलणे झाले नाही. त्यानंतर शेवटची भेट या हेतूने आम्ही भेटायचं ठरवलं. त्या भेटीत आम्ही इतर सर्व गोष्टींबद्दल आणि झालेल्या गैरसमजाबद्दल बोललो आणि शेवटी आमचे नाते संपवण्याचा विचार सोडून दिला”.
आणखी वाचा – अधिपतीच्या गैरसमजामुळे अक्षरा घर सोडणार?, भुवनेश्वरीची चाल यशस्वी, मालिकेत मोठा ट्विस्ट
शबाना आझमी म्हणाल्या की, “जावेद अख्तर हा अतिशय निष्पाप माणूस आहे आणि हाच गुण तिला त्याच्याबद्दल सर्वात जास्त आवडतो. त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या लोकांशीही तो नम्रपणे बोलतो. त्यांची जी तत्त्वे आहेत तीसुद्धा मला फार आवडतात. याबरोबरच त्यांची विनोदबुद्धी व हुशारी हे गुणसुद्धा मला फार आवडतात”.