मराठी सिनेसृष्टीतील सदाबहार असणारी जोडी म्हणून अभिनेते रमेश देव व अभिनेत्री सीमा देव यांच्याकडे पाहिलं जातं. १९५० च्या आसपास रमेश देव यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात केली. तर १९६०च्या आसपास सीमा देव यांनी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं. दरम्यान त्या काळात रमेश देव व सीमा देव यांनी सिनेसृष्टीतील एकत्रित प्रवासही सुरु केला. जगाच्या पाठीवर या चित्रपटातून ही जोडी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्रित पाहायला मिळाली. त्यानंतर अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमधून या जोडीने आपली अभिनयाची कारकीर्द सुरु केली. (Seema Deo Namestory)
सीमा देव यांनी १९६० सालापासून सिनेमाविश्वात रुपेरी पडदा गाजवायला सुरुवात केली. मात्र सीमा देव या नावाने आज संपूर्ण सिनेसृष्टी व चाहते त्यांना ओळखत असले तरी सीमा हे त्यांचं पडद्यावरील नाव होत, सीमा यांनी त्यांचं खरं नाव पडद्यावर कधीच वापरलं नाही. सीमा यांचं खरं नाव नलिनी सराफ होतं. एक काळ होता जेव्हा नलिनी सराफ (सीमा देव) यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवायला सुरुवात केली होती. नलिनी यांनी त्यांचे पडद्यावरचे नाव ‘सीमा’ ठेवले होते.
सीमा या नावानेच आज संपूर्ण सिनेसृष्टी सीमा देव यांना ओळखते. मात्र रमेश देव प्रेमाने सीमा देव यांना कायम नलू या नावाने आवाज देत. बऱ्याच मुलाखतींमध्ये बोलताना त्यांनी सीमा यांचा उल्लेख नलू या नावानेच केला आहे.

आणखी वाचा – ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड, मुंबईतील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
वयाच्या ८१व्या वर्षी अभिनेत्री सीमा देव यांचं आज सकाळी निधन झालं आहे. मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव गेल्या काही वर्षांपासून अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. वांद्रे येथील घरी आज बरीच मंडळी सीमा देव यांच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचली आहेत. देव कुटुंबासह संपूर्ण सिनेविश्वात शोककळा पसरली आहे.