ऑनलाइन फसवणूक आणि त्यामध्ये गुंतणाऱ्या माणसांची संख्या अलिकडे झपाट्याने वाढत आहे. whatsapp किंवा इतर मॅसेजेसद्वारे लिंक पाठवण्यात येते. अनेकांनी ती लिंक फॉलो केल्यास फसवणूकीला बळी पडल्याचे कित्येक प्रकरणं समोर आली आहेत. असाच एक फसवणूकीचा प्रकार उघड झाला आहे. Whatsapp द्वारे सध्या एक मॅसेज सर्वत्र व्हायरल होत आहे. या मॅसेजद्वारे पैसे कमावण्याचे मार्ग सांगितले जातात. सोशल मीडियावर अनेकांनी याबाबत स्क्रिनशॉर्ट शेअर करत प्रकरण समोर आणलं. हा मॅसेज तुम्हालाही आला असेल तर हे प्रकरण नक्की काय?, तुमच्याबाबत हे घडत असेल तर काय करावं? हे सविस्तर जाणून घेऊया. (whatsapp fraud through fake messages)
कशाप्रकारचे मॅसेज येतात?
गेल्या काही दिवसांपासून whatsapp वापरणाऱ्या व्यक्तींना एका नंबरद्वारे मॅसेज येत आहे. मॅसेज आल्यानंतर सुरुवातील साधीच चर्चा केली जाते. त्यानंतर समोरुन मॅसेज करणारी व्यक्ती एका टास्क देते. तो टास्क पूर्ण केल्यास पैसेही मिळणार असं सांगते. पण टास्क पूर्ण झाल्यानंतर पैसे न मिळता फसवणूक होते. याबाबत एका युजरने स्क्रिनशॉर्ट शेअर करत माहिती दिली आहे.
आणखी वाचा – १५ वर्ष वेश्याव्यवसाय, आता घरी गेली पण आतमध्ये न घेताच…; ‘ती’चं एकटीचं आयुष्य, मुलाला वाढवण्यासाठी…
फेक मॅसेज आणि…

एका युजरने स्क्रिनशॉर्ट शेअर करत म्हटलं की, “7830305990 नंबरद्वारे मला मॅसेज आला. हाय, तुम्ही कसे आहात? असा मॅसेज आला”. दुसऱ्या एका युजरने म्हटलं की, “मला याआधीही अशाप्रकारचे मॅसेज आले आहेत. हा कोणता स्कॅम आहे का? हे मला जाणून घ्यायचं आहे. माझा नंबर यांच्याकडे गेलाच कसा?”. युजर्सने स्क्रिनशॉर्ट शेअर केल्यानंतर अनेकांनी कमेंट करत आपले अनुभव सांगितले आहेत.
आणखी वाचा – स्वप्न पडतात पण झोपेतून उठल्यानंतर त्याचा विसर का पडतो?, यामागे नेमकं कारण काय?, वैज्ञानिक कारणांनुसार…
हाय, हॅलो म्हणत समोरील व्यक्ती बोलण्यास सुरुवात करते. त्यानंतर एखाद्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटला रेटिंग देण्यास सांगण्यात येतं. जेव्हा तुम्ही रेटिंग देता तेव्हा काही वेळा समोरुन पैसे देण्यात येतात. त्यानंतर मात्र त्यांच्याकडून अनेकांना त्रास देण्यात येतो. तुम्हालाही असे मॅसेज येत असतील तर त्यांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करणं टाळा. त्यांच्याद्वारे पाठवण्यात आलेले डॉक्युमेंटही डाऊनलोड करु नका. पण तुमच्याबरोबर जर फसवणूक होत असेल तर तक्रार केल्यास त्यांना योग्य ती शिक्षा मिळू शकते.