हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारचे सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या सणांना विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक मराठी महिन्यात विविध प्रकारचे सण उत्सव येतात. या मराठी महिन्यांमध्ये महत्त्वपूर्ण असणारा महिना म्हणजे श्रावण महिना होय. हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित आहे. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. कारण या महिन्यात शंकर भगवान यांची पूजा केली जाते. शिवपुराणानुसार श्रावण महिन्यात भगवान शंकरांची यथायोग्य पूजा केल्याने मनुष्याला दु:खपासून मुक्ती मिळते अन् सुखाची प्राप्ती होते. यंदाचा श्रावण महिना येत्या ५ ऑगस्टपासून सुरु होत आहे.
याच श्रावण महिन्यात महादेवांची अनेक भक्तीगीते ऐकली जातात आणि भक्तगण या गाण्यांवर तल्लीन होत महादेवांची पूजा व उपसना करतात. मराठीसह हिंदी व अनेक भाषांमध्ये आजवर महादेव यांच्यावर आधारित गाणी प्रदर्शित झाली आहेत. ही गाणी भक्तगणांच्या पसंतीसही पडली आहेत. अशातच आता ‘इट्स मज्जा’ही शंकर भगवान यांना समर्पित असं एक खास भक्तीगीत घेऊन आलं आहे. श्रावण महिन्यात शंकर भगवान यांची उपसना करताना भक्तांना भक्तिमय वाटण्यासाठी ‘इट्स मज्जा’ने सर्व महादेव भक्तांसाठी खास गीत आणलं घेऊन आलं आहे.
‘जय भोले’ असं या भक्तीगीताचे शीर्षक असून हे भक्तीगीत बुद्धा यांनी गायलं आहे. तर या गाण्याचे शब्दांकन रवी बस्नेत यांनी केलं आहे. तसेच या सुमधुर भक्तीगीताला सुरेल चाल देण्याचे काम राजीब व मोना यांनी केलं आहे. त्याचबरोबर ‘जय भोले’ या भक्तीगीताच्या निर्मितीची जबाबदारी शौरीन दत्ता यांनी पार पडली आहे. या गाण्याचे प्रोजेक्ट हेड हे अनंत श्रीवास्तवा हे आहेत. तर क्रिएटिव्ह हेड अंकिता लोखंडे या आहेत.
दरम्यान, श्रावण स्पेशल ‘जय भोले’ हे महादेवांचे खास भक्ती सर्वांना ‘इट्स मज्जा’च्या युट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे. त्याचबरोबर JioSaavn, Wynk Music, Apple Music, Amazon Music, Gaana व Spotify आदी ऑडिओ प्लॅटफॉर्मवरसुद्धा तुम्हाला हे गाणं ऐकता येणार आहे. नुकतंच हे गाणं प्रदर्शित झालं असून अल्पावधीतच या गाण्याल महादेव भक्तांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हे खास भक्तीगीत ऐकून महादेवांच्या भक्तीत तल्लीन होऊ शकता.