छोट्या पडद्यावरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत मागील काही दिवसांपासून अनेक उत्कंठावर्धक वळणं येत आहेत. रुपालीला विरोचकाने नवी शक्ती दिल्यानंतर त्रिनयना देवीच्या मुली हतबल झाल्याचे पाहायला मिळाले होते. रुपालीने आपल्या नव्या शक्तीने केतकी काकु, फाल्गुनी यांच्यासह राजाध्यक्ष कुटुंबातील शेखर, तन्मय व तेजस यांनाही संमोहित केले आहे. त्यामुळे आता राजाध्यक्ष कुटुंबातील प्रत्येक माणूस रुपाली सांगत असल्याप्रमाणे वागत असल्याचे आतापर्यंत मालिकेत पाहायला मिळाले.
तसेच रुपालीला अद्दल घडवण्यासाठी नेत्रा व इंद्राणी यांनी तिला पेटीत डांबून ठेवले आहे. रुपाली समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात बघून वश करते. रुपालीच्या या वश करण्याच्या युक्तीबद्दल नेत्रा व इंद्राणी यांना माहिती झाली असून त्यांनी रुपालीच्या डोळ्यांत तिखट मसाला टाकून तिच्या गळ्यात साखळदंड अरकवून तिला एका पेटीत डांबतानाचे पाहायला मिळाले. या सर्वात आता नेत्रा व अद्वैत यांच्यातील प्रेम बहरतानाचे पाहायला मिळत आहे.
नुकताच मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला असून या प्रोमोद्वारे अद्वैत व नेत्रा यांना त्यांचे स्वत:चे मूल हवे असल्याचे दाखवण्यात आले आहे. या प्रोमोमध्ये नेत्रा शेखर, तन्मय, फाल्गुनी, केतकी काकू यांच्याकडे बघून नेत्रा असं म्हणते की, “असं वाटत आहे की अचानक आपल्या पदरात लहान-लहान मुलं पडली आहेत आणि आपण हळहळू त्यांना सांभाळायचं कसं हे शिकत आहोत.” तर यापुढे अद्वैतही नेत्राकडे बघून “आता लवकरच ही लहान मुलं पुन्हा मोठी होणार आहेत. त्यानंतर आपल्यासुद्धा पदरात एक लहान मुलं पडायलाच हवं” असं म्हणत तिच्याकडे बाळाची इच्छा व्यक्त करतो.
दरम्यान, नेत्रा-अद्वैतच्या या नवीन प्रोमोमुळे मालिकेत लवकरच नवीन कथानक पाहायला मिळणार आहे. या नवीन भागांत एकीकडे नेत्राचा विरोचकाचा संघर्ष पाहायला मिळणार आहे, तर दुसरीकडे नेत्रा-अद्वैत यांचे नाते आणखी नवीन वळणावर पोहचणार आहे. त्यामुळे मालिकेच्या नवीन भागासाठी प्रेक्षक चांगलेच आतुर आहेत.