मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. या महिन्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचा अवतार असणाऱ्या दत्तात्रेय महाराजांची जयंती साजरी केली जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावानेदेखील ओखळले जाते. यंदा दत्त जयंती ही १४ डिसेंबरला शनिवारी पार पडली. दत्त जयंतीनिमित्त अनेक भाविक ठिकठिकाणी दत्तगुरुंचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. सारेगमप लिटिल चॅंम्प्स फेम मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे ही जोडी सुद्धा गिरनारमधील दत्तगुरुंचे दर्शन घेण्यासाठी पोहोचली होती आणि याची खास झलक त्यांनी सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. (Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate girnar visit)
मुग्धा व प्रथमेश लघाटे ही मराठी संगीत विश्वातील सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या जोड्यांपैकी एक जोडी आहे. हे दोघे सोशल मीडियावर आपल्या गायनाचे व्हिडीओ तसंच कामानिमित्तची माहितीई शेअर करत असतात. अशातच दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ही दोघे गिरनारमधील दत्तगुरुंचचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले असल्याचे पहायला मिळत आहे. खास व्हिडीओ शेअर करत त्यांनी या गिरनार यात्रेची खास झलक शेअर केली आहे. यामध्ये मुग्धा, प्रथमेश व त्यांचे मित्रही पाहायला मिळत आहेत.
“४ दिवसांपूर्वी माझी तिसरी आणि आमच्या लग्नानंतरची आमची पहिली गिरनार यात्रा दत्त महाराजांनीच करुन घेतली. त्याचा छोटा व्हिडिओ आज श्री दत्तजयंतीच्या निमित्ताने शेअर करत आहे. जय गिरनारी”. असं म्हणत मुग्धा व प्रथमेश यांनी चाहत्यांना “तुम्हा सर्वांना श्री दत्तजयंतीच्या खूप शुभेच्छा” असं म्हटलं आहे. या व्हिडीओला अनेकांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसादही दिला आहे. तसंच अनेकांनी या व्हिडीओखाली मुग्धा व प्रथमेश यांना दत्तजयंतीनिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मुग्धाने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे गिरनारचे काही फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता यांनी खास व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा – Bigg Boss 18 ‘या’ दिवशी घेणार प्रेक्षकांचा निरोप, तारीखही आली समोर, जाणून घ्या…
दरम्यान, ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या कार्यक्रमापासूनच मुग्धा व प्रथमेश यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. केवळ महाराष्ट्रातचं नव्हे तर संपूर्ण देशभरात दोघांचे अनेक चाहते आहेत. अमेक ठिकाणी हे दोघे गायनाचे अनेक कार्यक्रम करत असतात आणि त्याच्या काही खास आठवणीही शेअर करताना दिसतात.