साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिच्या निधनाची बातमी समोर आली आहे. हिमाचल प्रदेश येथे एका कार अपघातात तिचे निधन झाले आहे. वयाच्या बत्तिसाव्या वर्षी अभिनेत्री वैभवी हिने अखेरचा श्वास घेतला आहे. वैभवीच्या निधनाच्या बातमीने सिनेमाविश्वात शोककळा पसरली आहे.(Vaibhavi Upadhyaya Car Accident)
सूत्रांच्या माहितीनुसार, वैभवी उपाध्याय ही तिच्या पतीसोबत हिमाचल प्रदेश येथे फिरायला गेली होती. दरम्यान कारचा अपघात झाला असून सोमवारी (२२ मे) रोजी हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे.
हा अपघात इतका भीषण होता की वैभवीचा जागीच मृत्यू झाला. वैभवी ही तिच्या होणाऱ्या पतीबरोबर फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी एका वळणावर त्यांच्या कारचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. या अपघातानंतर त्यांची कार थेट दरीत कोसळली. वैभवीच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ११ वाजता मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.(Vaibhavi Upadhyaya Car Accident)