‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटात संजय नार्वेकर यांच्या मनातला आवाज ऐकणारी छोटी मुलगी म्हणजेच सना शिंदे. या चित्रपटात सनाचा छोटासा रोल प्रेक्षकांना तिची भुरळ घालून गेला. सना तिच्या आजोबांच्या म्हणजेच ‘शाहीर साबळे’ यांचा जीवनपट “महाराष्ट्र शाहीर” या चित्रपटात लवकरच दिसणार आहे. सनाने नुकताच तिच्या आजोबासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Sana Shinde Special Post )
हे देखील वाचा: बापाची व्यथा मांडणारी मिलिंद गवळींची बापलेकीची ती पोस्ट चर्चेत
हा फोटो सनाच्या बालपणीचा आहे. या फोटोमध्ये सना तिचे आजोबा कृष्णराव साबळे यांच्या सोबत दिसत आहे. या पोस्टला सनाने “So everyone always asks me what was my relationship like with my great grandfather or त्यांची कुठली स्पेशल आठवण? I found the most precious picture of us and I am forever grateful to be his great grand daughter!” असे कॅप्शन दिले आहे.

हे देखील वाचा: उर्मिलाची रील आणि रिअल लेकीसोबत सेटवर धमाल
सनाच्या या पोस्टवर अश्विनी महांगडे तसेच दीपा चौधरी या दोघीनीं “किती गोड” अशी कमेंट केली आहे. तसेच शाहिर साबळे यांची कन्या वसुंधरा साबळे यांनी “दुधावरच्या सायीतल लोणी आहेस तु सना”… अशी कमेंट केली आहे. (Sana Shinde Special Post )
सना शिंदे हिचे वडील केदार शिंदे हे मराठी चित्रपट सृष्टीमधील मोठं नाव आहे. त्यांनी अनेक मराठी सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘अगं बाई अरेच्चा’ हा केदार शिंदे यांचा चित्रपट असून ह्या चित्रपटात सना शिंदे हिने छोटे पात्र साकारले होते. परंतु सना आता महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातून तब्बल २० वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला मुख्य भूमिकेत पाहिल्यादाचं येत आहे.