शनिवार, मे 10, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 18 ‘या’ दिवशी घेणार प्रेक्षकांचा निरोप, तारीखही आली समोर, जाणून घ्या…

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 15, 2024 | 9:36 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Salman Khan show Bigg Boss 18 will end in the month of January and date has been revealed see the details

सलमान खानचा बिग बॉस १८ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, कोण होणार विजेता?

टेलिव्हिजनवरील नेहमीच चर्चेत राहणारा शो म्हणजे बिग बॉस. यंदाचे ‘बिग बॉस हिंदीचे १८वे पर्व आहे. ६ ऑक्टोबरला मोठ्या धूमधडाक्यात हा शो सुरु झाला. एकूण १८ स्पर्धकांनी स्पर्धकांनी या घरात प्रवेश केला होता, ज्यात ९० च्या दशकातील अभिनेत्री शिल्पा शिरोडकर ते टीव्ही अभिनेता विवियन डीसेना आणि करणवीर मेहरा यांसारख्या नावांचा समावेश होता. शोच्या प्रीमियरला जबरदस्त रेटिंग मिळाली आणि सीझन हिट झाला. ‘बिग बॉस १८’ हा शो टॉप-१० यादीत कायम आहे. ऑक्टोबरमध्ये सुरु झालेला ‘बिग बॉस १८’ आता हळूहळू ग्रँड फिनालेकडे वाटचाल करत आहे आणि त्याची तारीखही समोर आली आहे. (Salman Khan Bigg Boss 18 will end soon)

‘बिग बॉस तक’ ने सलमान खान ‘बिग बॉस १८’ च्या विजेत्याची घोषणा कोणत्या दिवशी करणार आणि त्याचा ग्रँड फिनाले कधी होणार याची माहिती दिली आहे. या शोचा फिनाले १९ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. तथापि, निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही किंवा कोणतीही सूचना दिली नाही. मात्र, करणवीरने नुकतेच एका एपिसोडमध्ये सांगितले होते की, आता अजून पाच आठवडे बाकी आहेत. त्यानुसार पाच आठवड्यांनंतरची तारीख १९ जानेवारी आहे.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : अनुष्काच्या नव्या कारस्थानात अडकणार का पारू?, आदित्यबरोबर लग्न झालं असल्याचा केला खुलासा, प्रोमो समोर

‘बिग बॉस १८’ मधून आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेले स्पर्धक आहेत – गुणरत्न सदावर्ते, हेमा शर्मा, मुस्कान बामने, नायरा बॅनर्जी, शहजादा धामी, अरफीन खान, एलिस कौशिक आणि अदिती मिस्त्री. तजिंदर बग्गा यांनाही घरातून बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आता ‘बिग बॉस 18’ मध्ये राहिलेल्या स्पर्धकांमध्ये विवियन दसना, करणवीर मेहरा, अविनाश मिश्रा, चाहत पांडे, ईशा सिंग, रजत दलाल, शिल्पा शिरोडकर, कशिश कपूर, सारा अरफीन खान, यामिनी, चुम दरंग, दिग्विजय राठी, इडन आणि श्रुतिका यांचा समावेश आहे.

आणखी वाचा – 15 December Horoscope : रविवारी ‘या’ राशीच्या लोकांवर असणार सूर्यदेवाची कृपा, होणार आर्थिक भरभराट, जाणून घ्या…

जर या बिग बॉस १८ चा ग्रँड फिनाले येत्या १९ जानेवारीला होणार असेल तर मग एकूण पाच आठवडे बाकी आहेत आणि १४ स्पर्धक घरात आहेत. त्यानुसार, दर आठवड्याला किमान दोन एलिमिनेशन होऊ शकतात, जेणेकरुन बिग बॉस १८चे टॉप-६ अंतिम स्पर्धक मिळतील. त्यामुळे आता हे टॉप-६ कोण असणार? आणि या शोचं विजेता कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Tags: bigg boss 18 full episode todaybigg boss 18 promo todaySalman Khan Bigg Boss 18 will end soon
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

operation sindoor soldier news
Women

आठ महिन्याची लेक कडेवर घेत पतीला अखेरचा निरोप, शहीद जवान सचिन वनांजेंच्या पत्नीच्या अश्रूंचा बांध फुटला अन्…; मुखाग्नी देताना…

मे 10, 2025 | 2:32 pm
Jawan Murali Naik
Social

शेवटचा व्हिडीओ कॉल, मजुरी करणारे वडील अन्…; अवघ्या विशीत वीरमरण आलेल्या मुरली नाईक यांच्या कुटुंबियांचा टाहो, एकुलता एक लेक आणि…

मे 10, 2025 | 2:01 pm
Arijit Singh
Entertainment

मनाचा मोठेपणा! अरिजित सिंगच्या हॉटेलमध्ये सर्वसामांन्यांना इतक्या रुपयांत पोटभर जेवण, गायकाच्या निर्णयाचं कौतुक

मे 10, 2025 | 12:41 pm
akshay kelkar wedding
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, शाही विवाहसोहळ्याची झलक समोर, लूकची जोरदार चर्चा

मे 10, 2025 | 11:26 am
Next Post
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate girnar visit, pra

दत्त जयंतीनिमित्त मुग्धा-प्रथमेश यांनी गिरनारमधील दत्तगुरुंचे घेतलं दर्शन, खास व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "आमच्या लग्नानंतर..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.