शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हलक्यात घेऊ नका”, सलमान खानला लॉरेन्स बिष्णोई गॅंगकडून पुन्हा धमकी, केली ‘इतक्या’ कोटींची मागणी अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 18, 2024 | 10:40 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Salman Khan Receives New Death Threat 

"हलक्यात घेऊ नका", सलमान खानला लॉरेन्स बिष्णोई गॅंगकडून पुन्हा धमकी, केली 'इतक्या' कोटींची मागणी अन्…

Salman Khan Receives New Death Threat  : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला पुन्हा एकदा धमकी मिळाली असल्याचं समोर आलं आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अवघ्या पाच दिवसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीने ही धमकी दिल्याचा आरोप आहे. यावेळी मुंबई वाहतूक नियंत्रणाला धमकीचा संदेश आला आहे. संदेश देणाऱ्याने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या जवळचे असल्याचे सांगितले आहे. यात ५ कोटींचाही उल्लेख आहे. ५८ वर्षीय सलमान खानला गेल्या अनेक वर्षांपासून तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून धमक्यांचा सामना करावा लागत आहे. पोलिसांनी सलमानला वाय सुरक्षा दिली आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्याच्या हत्येनंतर अभिनेत्याच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे.

ताज्या माहितीनुसार, मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सॲपवर धमकीचा मेसेज आला आहे. त्यात म्हटले आहे की, लॉरेन्स बिश्नोईबरोबरचा दीर्घकाळ चाललेला वाद मिटवला जाऊ शकतो आणि त्यासाठी सलमान खानकडून ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतःला बिश्नोई टोळीचा जवळचा असल्याचे सांगितले आहे. सलमान खानने पैसे न दिल्यास त्याचे नशीब बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट होईल, असे धमकीवजा पत्र लिहिले आहे.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : पारू-आदित्यचे जुळतायत सूर, मारुतीची त्यांच्या मैत्रीला नापसंती, पुढे काय होणार?

ट्रॅफिक पोलिसांना व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला आहे, ज्याच्या शेवटी ‘हलक्यात घेऊ ​​नका’, असेही लिहिले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानला मिळालेल्या या नव्या धमकीची चौकशी सुरु झाली आहे. गुन्हे शाखा त्याची गांभीर्याने दखल घेत आहे. संदेश पाठवणाऱ्याचा माग काढला जात आहे. याशिवाय यामागे काही खोल कट आहे का, याचाही तपास सुरु आहे. दुसरीकडे, सलमान खानच्या कुटुंबीयांना त्याच्या सुरक्षेची चिंता आहे. बिश्नोईने सिद्दिकीच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती, परंतु सखोल कट लपवण्याचा हा डाव असू शकतो, असे कुटुंबाच्या जवळच्या सूत्राने सांगितले. सूत्राने इंडिया टुडेला सांगितले की, “एखाद्याला तुरुंगातून काम करणे खरोखर सोपे आहे का आणि कोणीतरी सलमानला घाबरवण्यासाठी बाबा सिद्दीकींवर हल्ला का करेल? हे सर्व अतिशय संशयास्पद दिसते”.

आणखी वाचा – Bigg Boss फेम अभिजीत सावंतने सुरु केलं व्लॉगिंग, बायकोबरोबरचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, अरबाज खाननेही सलमान खानची सुरक्षा आणि बाबा सिद्दीकीच्या हत्येबाबत मौन सोडले आहे. तो म्हणाला, “आम्ही ठीक आहोत. मी असे म्हणणार नाही की आम्ही पूर्णपणे ठीक आहोत, कारण सध्या कुटुंबात बरेच काही चालू आहे. प्रत्येकजण चिंतेत आहे. आम्ही शक्य ते सर्व करण्याचा प्रयत्न करत आहोत. सरकार आणि पोलिसांसह प्रत्येकजण आणि आम्ही देखील हे सुनिश्चित करत आहोत की गोष्टी सुरळीत व्हाव्यात आणि सलमान भाई सुरक्षित राहतील”. बाबा सिद्दीकी त्यांच्या सोशलाईट इमेज आणि भव्य इफ्तार पार्टीसाठी ओळखले जात होते. ते अनेक बॉलिवूड स्टार्सच्या जवळ होते. त्यांच्या हत्येने चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. या घटनेनंतर सलमान खानच्या चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे.

Tags: lawrence bishnoi gangsalman khanSalman Khan Receives New Death Threat
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Mrunal Dusanis

नवा व्यवसाय की आणखी काही?, मृणाल दुसानिसची नवी सुरुवात, शेअर केलेल्या व्हिडीओची चर्चा, नेटकरी म्हणाले…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.