सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे अंबानी कुटुंबातील संगीत सोहळ्याची. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याची जोरदार तयारी सर्वत्र सुरु आहे. अनंत- राधिकाच्या भव्यदिव्य प्री वेडींग सोहळ्यानंतर आता असाच भव्यदिव्य संगीत सोहळा देखील नुकताच पार पडला. या संगीत सोहळ्यात अनेक प्रसिद्ध कलाकार, उद्योगपती यांनी हजेरी लावली होती. या संगीत सोहळ्यात बॉलीवूड मधील अनेक कलाकारांनी सहभाग घेऊन संगीत सोहळ्याचा आनंद लुटल्याचा पाहायला मिळाला. सध्या या संगीत सोहळ्यातील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओ मध्ये बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आणि अनंत अंबानी यांचा धमाल डान्स पाहायला मिळतोय.(Anant Ambani Radhika Merchant Sangeet)
सलमान खानच्या ‘हर दिल जो प्यार करेगा’ या चित्रपटातील आणि सोनू निगम यांनी गायलेल्या ‘ऐसा पेहली बार हुआ है’ या गाण्यावर सलमान खान आणि अनंत अंबानी थिरकताना पाहायला मिळाले. या व्हिडिओवर सलमान खानच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत आपली पसंती दर्शवली. सलमान खानसह बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी देखील उपस्थिती दर्शवली होती. जगप्रसिद्ध पॉपस्टार जस्टीन बिबर याने देखील या संगीत सोहळ्यात हजेरी लावली होती. जस्टीनच्या या सोहळ्यातील उपस्थितीवर चांगल्याच चर्चा देखील रंगल्या होत्या.
हे देखील वाचा- नाटकाच्या दौऱ्यानिमित्त बाहेर असलेल्या संकर्षण कऱ्हाडेला येत आहे मुलांची आठवण, पोस्ट शेअर करत म्हणाला, “सकाळ झाली आणि…”
संगीत सोहळा, प्री वेडींग यासह चर्चा रंगली ती म्हणजे अनंत-राधिकाच्या लग्न पत्रिकेची. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट १२ जुलैला शुभ मुहूर्तावर म्हणजेच दुपारी ३ वाजता लग्नबंधनात अडकणार आहेत. हा विवाह सोहळा अंबानी कुटुंबाच्या अँटिलिया निवासस्थानी पार पडणार असायची माहिती समोर आली आहे. दरम्यान लग्नसोहळ्यानंतर १३ जुलै रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत अन्य विधी पार पडणार असल्याचं सांगितलं जातंय. तसेच अनंत- राधिका यांचा रिसेप्शन सोहळा १४ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे.(Anant Ambani Radhika Merchant Sangeet)
हे देखील वाचा- अर्जुन-पूर्णा आजीमधील अबोला संपला, सुभेदार कुटुंबाची सायलीवर मोठी जबाबदारी, नातसून म्हणून कर्तव्य पार पाडेल का?
अनंत- राधिकाच्या लग्नात नक्की कोण कोण हजेरी लावणार आणि हा सोहळा नक्की कसा पार पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर या लग्नसोहळ्यास मनोरंजन, क्रीडा तसेच राजकीय क्षेत्रातील कोण कोणते चेहरे उपस्थित राहणार हे पाहणं देखील रंजक ठरणार आहे.