सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सैराट’मधील लंगड्या अजूनही करतो शेती, गावाकडे गुरांना चरायलाही घेऊन जातो अन्…; पाहा फोटो

Saurabh Moreby Saurabh More
जून 18, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 7 mins read
google-news
Tanaji Galgunde shared his farming and village photos

मराठी मनोरंजन विश्वातील मैलाचा दगड ठरलेल्या ‘सैराट’ या चित्रपटाने मराठीसह बॉलिवूडलाही वेड लावले. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाचे आजही अनेक प्रेक्षकावर गारुड आहे. २९ एप्रिल २०१६ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि आज या चित्रपटाला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘सैराट’मध्ये नागराज मंजुळे यांनी नवख्या चेहऱ्यांना संधी देत रुपेरी पडद्यावर आणले होते.

या चित्रपटातील आर्ची-परशा यांच्यासह सल्या-बाळ्या व इतर काही कलाकारदेखील चांगलेच लोकप्रिय झाले. या चित्रपटात ‘लगंड्या’ म्हणून नावारुपाला आलेला अभिनेता म्हणजे तानाजी गालगुंडे. ‘सैराट’मध्ये “परशा आर्ची आली रे आली” असं म्हणणाऱ्या तानाजी गालगुंडेने ‘सैराट’नंतर अनेक चित्रपटांत छोट्यामोठ्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनय क्षेत्राबरोबरच तानाजी पट्टीचा जलतरणपटूदेखील आहे. याशिवाय तो त्याच्या गावी शेतात चांगलाच रमतो.

View this post on Instagram

A post shared by Tanaji Galgunde (@galgundetanaji)

तानाजी हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. यापैकी त्याच्या काही पोस्टमधून त्याच्या गावची खास झलक पाहायला मिळत आहे. अभिनेत्याने कालच शेअर केलेल्या काही फोटोमध्ये तो शेळ्या चरायला घेऊन गेला असल्याचे पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Tanaji Galgunde (@galgundetanaji)

आणखी वाचा – धर्म की नात्याच्या विरोधात कुटुंबिय?, झहीर इक्बालशी लग्न करण्यावरुन सोनाक्षी सिन्हाच्या घरातील मंडळींची नाराजी, आईचा मोठा निर्णय

तसेच त्याच्या आणखी एका पोस्टमध्ये तो हरभरा काढून म्हशीला खाऊ घालत आहे. तसेच त्याने हरभऱ्याच्या शेतातले काही खास फोटोही शेअर केले आहेत. पावसात भिजताना, बैलगाडी चालवताना, द्राक्षाच्या बागेतले काही खास फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. तसेच त्याने सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो कोबी काढताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Tanaji Galgunde (@galgundetanaji)

आणखी वाचा – सहा महिन्यांची झाली सई लोकूरची लेक, अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट, म्हणाली, “मला तुझी आई म्हणून…”

दरम्यान, तानाजी हा ‘सैराट’ या चित्रपटानंतर अनेक चित्रपटात झळकला. यानंतर त्याने ‘गस्त’, ‘झुंड’, ‘माझा अगडबम’, ‘फ्री हिट दणका’, ‘एकदम कडक’ या चित्रपटात काम केले. तसेच ‘घर बंदूक बिरयानी’ व ‘नवरदेव बी.एस.सी.अ‍ॅग्री’ या चित्रपटातही मुख्य भूमिका केली होती. त्यामुळे आता अभिनेता कोणत्या नवीन भूमिकेतून किंवा नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार? याची त्याचे चाहते वाट पाहत आहेत.  

Tags: marathi actormarathi entertainment newsTanaji Galgunde
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi serial update rupali used her new power om advait see the details

रुपालीने अद्वैतवरच केला नवीन शक्तीचा वापर, नेत्रा गरोदर असल्याची माहिती अद्वैतच विरोचकापर्यंत पोहोचवणार, कुणाचा बळी जाणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.