Saif Ali Khan Attacked : सैफ अली खान हल्ला प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी पीआय सुदर्शन गायकवाड यांच्या जागी मुंबई पोलिसांनी अजय लिंगनूरकर यांची नियुक्ती केली आहे. सध्या सुरु असलेल्या तपासादरम्यान हा बदल करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी मुंबई पोलीस सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी शहजादच्या घरी गेले होते आणि त्यांनी गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार केले होते. यानंतरही पोलीस या प्रकरणाचा सातत्याने तपास करुन कारवाई पुढे नेत आहेत, मात्र दरम्यान बुधवारी सकाळी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आल्याचे समोर आले आहे.
शहजादला रविवारी अटक करण्यात आली होती आणि कोर्टात हजर केल्यानंतर त्याला पाच दिवसांच्या कोठडीवर पाठवण्यात आले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादने पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत कबूल केले आहे की, तो त्या रात्री सैफ अली खानच्या घरी गेला होता आणि त्याने सैफवर हल्लाही केला होता.
आणखी वाचा – ‘बालवीर’ फेम अभिनेत्याची लगीनघाई, नुकताच पार पडला साखपुडा, व्हिडीओमध्ये दिसली संपूर्ण झलक
मुंबई पोलिसांना सैफच्या बिल्डिंगमधून आरोपी शरीफुलच्या १९ बोटांचे ठसे सापडले असून, त्याची चौकशी सुरु आहे. पायऱ्या, बाथरुम, डक्ट शाफ्ट, बाथरुमच्या खिडकीवर तसेच पायऱ्यांवर या बोटांचे ठसे आढळून आले आहेत. सैफच्या घरात प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी आरोपींनी या पायऱ्यांचा वापर केला होता. या बोटांचे ठसे या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा मानला जातो.
आणखी वाचा – “जळणाऱ्यांना जळू दे”, ट्रोल करणाऱ्यांना Bigg Boss 18 च्या करणवीर मेहराचं सडेतोड उत्तर, म्हणाला, “नक्कीच…”
आरोपीला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. या कॉन्फरन्समध्ये पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीच्या प्राथमिक चौकशीत त्याने कबुली दिली होती की तो सैफ अली खानच्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसला होता. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी बांग्लादेशी नागरिक असल्याचे आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडवून आरोपी बांग्लादेशात पळून जाण्याचा विचार करत होता. मात्र तो तसे करण्याआधीच पोलिसांनी रविवारी पहाटे त्याला अटक केली.