हास्य हे मनुष्याच्या आयुष्यातील एक महत्वाची गोष्ट मानली जाते आणि ही महत्वाची गोष्ट वेळोवेळी पुरवली आहे ती मनोरंजन विश्वातील अनेक नाटक, चित्रपट आणि मालिकांनी. विविध वाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका मनोरंजना सोबतच समाज प्रबोधनाचं देखील काम करत आहेत.(Sachin Goswami Wife)
सोनी मराठी वाहिनी वर अशीच एक मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे ती म्हणजे ‘पोस्ट ऑफिस उघड आहे’. महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातील समीर चौघुले, वनिता खरात, दत्तू मोरे, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप, ओंकार राऊत, निखिल बने या सर्वांसोबतच मराठी इंडस्ट्रीतील दिग्ग्ज अभिनेते मकरंद अनासपुरे देखील या कार्यक्रमात प्रमुख भूमिकेत दिसतात.

टेकनॉलॉजि विकसित होण्याआधी संभाषणाचा महत्वाचं साधन मानलं जाणार पोस्ट ऑफिस कस होत? नवीन टेकनॉलॉजि नंतर पोस्ट ऑफिस मध्ये कसे बदल घडत गेले या सर्वांवर भाष्य करणारी ही मालिका आणि कलाकारांचा मिश्किल अभिनय यांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
हे देखील वाचा – महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या मंचावर MHJ च्या जावयाची धमाल.. पतीच्या उपस्थतीने अभिनेत्री चेतना भट भावुक
सोनी मराठी वरील या ‘ पोस्ट ऑफिस मध्ये आता नवीन सदस्यांची इंट्री झालेली दिसते. एका प्रोमोनुसार मालिकेत नव्या ऑफिसरच्या भूमिकेत दस्तुरखुद्द सचिन गोस्वामी यांच्या पत्नी सविता गोस्वामी दिसणार आहेत. तर या आधी सचिन गोस्वामींनी सुद्धा एक भूमिका या मालिकेत साकारली आहे. तर आता मिस्टर अँड मिसेस गोस्वामी यांची जोडी पडद्यावर कशी दिसणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक दिसत आहेत.(Sachin Goswami Wife)

तर काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अभिनयाने बहरणारी तसेच हाजत्रेच्या मंचावर निवेदिका म्हणून वावरणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी ने देखील पोस्ट ऑफिस उघड आहे या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे.
हे देखील वाचा – अखेर परश्याच लग्न जमलं? ‘जमलय बर का.. यायला लागतय!!!’ आकाश ठोसरची पोस्ट चर्चेत