‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या कालच्या भागात रुपाली ध्वज लपवण्यासाठी बाहेर पडली होती. त्यानंतर तिच्यामागोमाग इंद्राणीदेखील निघाली असल्याचे पाहायला मिळाले. अशातच आजच्या भागात इंद्राणी रुपालीच्या मागोमाग येते तेव्हा रुपाली तिच्या डोक्यात मोठा दगड घेऊन तिला मारण्याचा प्रयत्न करते. मात्र इंद्राणी यातून स्वत:चा बचाव करते. त्यानंतर दोघींमध्ये बाचाबाची होत असताना तिथे पोलिस येतात आणि त्यांची भांडणं सोडवतात. यानंतर रुपाली नाटक करुन इंद्राणी तिची मैत्रीण असल्याचे पोलिसांना भासवते. त्यामुळे ते पोलिस तिथून निघून जातात.
पुढे इंद्राणी नेत्रा व अद्वैत यांना घडलेल्या प्रकाराबद्दल सांगते आणि तेव्हा ती त्या ध्वजावर कट्यारीशिवाय मारण्याबद्दल लिहिले असल्याचेही सांगते. तेव्हा नेत्रासह सर्वचजण याविषयी काळजी करु लागतात. पुढे विरोचक प्रतिबिंब शक्तीचा वापर करुन अद्वैतचे प्रतिबिंब तयार करतो आणि त्याला नेत्राच्या खोलीत पाठवतो, विरोचकाला सांकेतिक शब्दाबद्दल माहिती झाल्यामुळे तो त्या सांकेतिक शब्दाचा वापर करण्याविषयी प्रतिबिंबाला सांगतो.
पुढे रुपाली घरातील लाइट बंद करते. त्यामुळे अद्वैत लाइट का गेली हे बघण्यासाठी खोलीच्या बाहेर पडतो आणि पुढे अद्वैतचे प्रतिबिंब नेत्राच्या खलीत जातो. पण नेत्राला ते प्रतिबिंब असल्याचे कळत नाही. कारण प्रतिबिंबाने मी काय म्हणतो असं म्हटलेलं असतं. यानंतर अद्वैतचे प्रतिबिंब रुपालीने सांगितल्याप्रमाणे नेत्राच्या पोटावर हात ठेवतो. एकीकडे प्रतिबिंब नेत्राच्या पोटावर हात ठेवून मंत्र उच्चारत असतो तर दुसरीकडे रुपाली वीणा वाजवत असते. याचा नेत्राला संशय येतो आणि तिला अद्वैतकीय प्रतिबिंबाचं संशय येतो, संशय आल्यामुळे नेत्रा सावध होते आणि तिच्यात व अद्वैतच्या प्रतिबिंबामध्ये युद्ध होते.
याचदरम्यान खरा अद्वैत शेखर व इंद्राणीसह नेत्राच्या खोलीत येऊन तिचा बचाव करतात. नेत्रा खोलीच्या बाहेर येताच रुपालीच्या खोलीत येते आणि रुपाली वाजवत असलेल्या विचित्र वीणाची तार तोडते. यामुळे विरोचकाला राग येतो. अशातच पुढच्या भागात रुपाली नेत्राच्या पोटातील बाळ हे विरोचकाचाच अंश असल्याचे म्हणत आहे. त्यामुळे आता मालिकेच्या पुढील ट्विस्टसाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत.