शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

एका निर्णयाने गोपी बहूचं उद्ध्वस्त झालं करिअर, खऱ्या आयुष्यावरही मोठा परिणाम, आता जगतेय असं आयुष्य

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 12, 2025 | 5:40 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Saath Nibhana Saathiya Gopi Bahu

एका निर्णयाने गोपी बहूचं उद्ध्वस्त झालं करिअर, खऱ्या आयुष्यावरही मोठा परिणाम, आता जगतेय असं आयुष्य

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील लोकप्रिय शो ‘साथ निभाना साथिया’ मध्ये गोपी बहूची भूमिका साकारुन लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री म्हणजे जिया मानेक. या मालिकेमुळेच जिया मानेकला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. या मालिकेत भूमिका साकारत असताना जिया या नावाने नाहीतर ती गोपी बहू म्हणूनच ओळखू लागली. जिया मानेकच्या एक्झिट नंतर मात्र तिची जागा देवोलिना भट्टाचार्जी हिने घेतली. ‘साथ निभाना साथिया’ ही मालिका जवळपास सात वर्षे सुरु होती, पण जिया मानेक या शोमध्ये गोपी बहूच्या भूमिकेत दोन वर्षे दिसली. जेव्हा जियाने साथ निभाना साथिया मालिका सोडली तेव्हा तिच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला.

जियाचा हा निर्णय तिच्या चाहत्यांना बिलकुल पटला नाही. जियाने हा शो सोडला तेव्हा या शोचे, निर्मात्याचे बरेच नुकसान झाले आणि त्याच वेळी तिच्या कारकीर्दीलाही याचा मोठा फटका बसला. जियाने हा शो का सोडला, या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायला तिचा चाहतावर्ग आजही उत्सुक आहे. याबद्दल बर्‍याच प्रकारच्या गोष्टी बोलल्या गेल्या, परंतु फारच कमी लोकांना यामागचं सत्य माहित आहे. जियाने स्वतःच एका मुलाखतीत यामागचं कारण सांगत अनेक अफवांना पूर्णविराम दिला.

आणखी वाचा – वयवर्ष जवळपास ८०, नीट चालताही येत नव्हतं तरीही…; संकर्षण कऱ्हाडेच्या चाहत्यांच्या ‘त्या’ कृतीचं कौतुक, अभिनेताही भारावला

View this post on Instagram

A post shared by Gia Manek (@gia_manek)

जियाने ‘साथ निभाना साथिया’ मालिकेला डान्स रिऍलिटी शो ‘झलक दिखलाजा’मुळे रामराम केला. जियाने एका मुलाखतीत सांगितले होते की, सुसंस्कृत सूनेची भूमिका साकारण्यास ती आता थकली आहे. अशा परिस्थितीत तिने यशाच्या शिखरावर असताना मालिका सोडून ‘झलक दिखलाजाा’मध्ये भाग घेण्याचा धोका पत्करला. अभिनेत्रीने सांगितले की निर्मात्यांना त्यांनी हा कार्यक्रम सोडावा अशी इच्छा नव्हती आणि त्यांनी तिला पटवून देण्याचा प्रयत्नही केला.

आणखी वाचा – “राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर…”, तेजस्विनी पंडितच भाष्य, म्हणाली, “स्वतःच्या कुटुंबापेक्षाही…”

मालिका सोडण्याच्या या निर्णयाबाबत जिया मानेक ठाम राहिली आणि ‘झलक दिखलाजाा’चा एक भाग बनली. शोमध्ये तिने उत्कृष्ट कामगिरी केली, मात्र नंतर ती अपात्र ठरली. त्यानंतर ‘जिया जीनी और जुजू’, ‘मनमोहिनी’, ‘तेरा मेरा साथ रहे’ यांसारख्या शोमध्ये दिसली पण ती गोपी बहूसारखी जादू या मालिकांमधून निर्माण करु शकली नाही.

Tags: gopi bahuSaath Nibhana Saathiya
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Siddharth Chandekar On Mother

"बाईला पुरुष लागतोच", आईच्या दुसऱ्या लग्नाबाबत सिद्धार्थ चांदेकर स्पष्टच बोलला, म्हणालेला, "माझ्या आईच आयुष्य…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.