Gia Manek Wedding : टेलिव्हिजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी चाहत्यांना सुखद धक्का देताना दिसत आहेत. अशातच आता आणखी एका टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीने गुपचूप लग्न केल्याची बातमी समोर आली. ‘साथ निभाना साथिया’ फेम अभिनेत्री जिया मानेक लग्नबंधनात अडकली आहे. तिने अत्यंत खासगी पद्धतीने वरुण जैनशी लग्न केले. जीयाने तिच्या लग्नाची घोषणा सोशल मीडियावर केली. थेट नवऱ्याबरोबरचे फोटो शेअर करत तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. नवऱ्यामुलीच्या वेशात जिया माणिक खूपच सुंदर दिसत होती. आता त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
जियाने लग्नाचे फोटो शेअर करत म्हटलं की, “देव आणि गुरुंच्या कृपेने आणि सर्व प्रेमाच्या वर्षावाने, आम्ही या कायमच्या मिलनात प्रवेश केला आहे. हातात हात घालून, हृदयापासून हृदयापर्यंत. आम्ही दोघे मित्र होतो, आज आम्ही पती-पत्नी आहोत. आमच्या सर्व प्रियजनांकडून मिळालेल्या प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छांसाठी खूप आभारी आहोत ज्यांनी हा दिवस खूप खास बनवला. श्री आणि श्रीमती म्हणून आयुष्यभर हास्य, साहस, आठवणी आणि एकत्र राहण्यासाठी शुभेच्छा. जिया आणि वरुण”.
फोटोमध्ये, जिया सोन्याची जरी असलेल्या साडीमध्ये दिसली. यासह, तिने घातलेल्या टेम्पल ज्वेलरीने तिच्या सुंदरतेत वाढ झाली. तिने मांग टिका, जड हार आणि कमरबंद, कानातले आणि लाल बांगड्या घातल्या होत्या. तिने तिची हेअरस्टाईल गजऱ्याने सुशोभित केली होती. या फोटोंमध्ये जिया मानेक तिच्या नवऱ्यासह खूप आनंदी आणि सुंदर दिसत होती.
जियाच्या इन्स्टाग्राम पोस्टनुसार, जिया मानेक आणि वरुण जैन यांनी लग्न केले. लग्नासाठी त्यांनी सर्वात जुनी विवाह पद्धत अनुभवली. भूत शुध्दीकरण विवाह ही शरीरात उपस्थित पाच घटक व्यवस्थित आयोजित करण्याची प्रक्रिया आहे. जिया मानेकबद्दल बोलायचे झाले तर, ‘साथ निभाना साथिया’, ‘तेरा मेरा साथ’, जिनी और जुजू’ आणि मनमोहिनी सारखे कार्यक्रम केले आहेत. ‘साथ निभाना साथिया’कडून तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. अभिनेत्रीला आपले वैयक्तिक आयुष्य अगदी खासगी ठेवायला आवडते.





