शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रितेश-जिनिलीयाची मुलं आजोबांच्या स्मृतिदिनानिमित्त नतमस्तक, हात जोडून नमस्कार करताना दिसले अन्…; संस्कारांचं कौतुक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 14, 2025 | 2:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vilasrao Deshmukh death anniversary

रितेश-जिनिलीयाची मुलं आजोबांच्या स्मृतिदिनानिमित्त नतमस्तक, हात जोडून नमस्कार करताना दिसले अन्…; संस्कारांचं कौतुक

Vilasrao Deshmukh death anniversary : महाराष्ट्राचे दिवंगत माझी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आठवणीत अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखने खास फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. रितेश व जिनिलिया दोघेही पोस्ट शेअर करत भावुक झाले आहेत. रितेश व जिनिलिया शोधलं मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ पाहून नेहमीच त्यांचं कौतुक होतं. याचबरोबर रितेश-जिनिलियाच्या मुलांचं म्हणजे राहील आणि रियान यांच्या संस्कारांचंही कौतुक होतं.

वडिलांची आठवण शेअर करत रितेशने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांची दोन्ही मुलं राहील आणि रियान आजोबांच्या फोटोसमोर नतमस्तक होताना दिसत आहेत. हात जोडून आजोबांना नमस्कार करतानाचा फोटो रितेशने शेअर करत “आजोबा, आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. विलासराव देशमुख स्मृतिदिन”, असं कॅप्शन या फोटोला दिलं आहे. रितेशच्या दोन्ही मुलांचे फोटो पाहून त्यांच्या संस्कारांचं भरभरुन कौतुक होताना पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – शहर, ग्रामीण भागातील दरी मिटवणारा ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित, कोकणातील लोकांचे स्वभाव उलगडत अनोखी कथा समोर

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

विलासराव देशमुख यांच्या जवळ रितेश आणि जिनिलिया दोघेही होते. रितेशचा त्याच्या वडिलांबरोबरचा बॉण्ड खूप खास होता, तर जिनिलियालाही ते सून नाही तर मुलगीच मानायचे. वडिलांच्या परवानगीने रितेशने राजकारण क्षेत्र न निवडता अभिनय क्षेत्राची निवड केली. आपलं या क्षेत्रात काही झालं नाही तर आपल्या वडिलांना लोक नाव ठेवतील याची भीती त्याच्या मनात होती. मात्र ही भीती त्याने जेव्हा विलासराव यांना बोलून दाखविली तेव्हा त्यांनी रितेशला एक सल्ला दिला.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या गाडीचा अपघात, बसच्या धडकेने चारचाकी गाडीच्या काचा फुटल्या आणि…; फोटो शेअर करत म्हणाली, “दुखापत…”

“माझ्या नावाची मी काळजी घेतो, तुझ्या नावाची तू घे”, असा सल्ला त्यांनी लेकाला दिला. आणि या एका सल्ल्याचा जोरावर रितेशने अथक मेहनत करत सिनेविश्वात आपलं नाव कमावलं. याचबरोबर जिनिलियानेही तिचं असं स्वतःच स्थान निर्माण केलं. रितेश व जिनिलिया ही सिनेविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. महाराष्ट्राचे लाडके दादा-वाहिनी अशी त्यांची ओळख आहे.

Tags: entertainmentRiteish Deshmukh and Genelia Deshmukhvilasrao deshmukh
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
arjun tendulkar fiance saaniya chandok

सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सूनेला पाहिलंत का?, स्टायलिंगमध्ये लेक सारालाही देतेय टक्कर, अर्जुनच्या पत्नीची चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.