रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सूनेला पाहिलंत का?, स्टायलिंगमध्ये लेक सारालाही देतेय टक्कर, अर्जुनच्या पत्नीची चर्चा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 14, 2025 | 3:40 pm
in Lifestyle
Reading Time: 1 min read
google-news
arjun tendulkar fiance saaniya chandok

सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सूनेला पाहिलंत का?, स्टायलिंगमध्ये लेक सारालाही देतेय टक्कर, अर्जुनच्या पत्नीची चर्चा

arjun tendulkar fiance saaniya chandok : क्रिकेटचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाला असल्याची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली आहे. मुंबईतील व्यावसायिक रवी घई यांची नात सानिया चांदोक हिच्याशी खासगी पद्धतीने साखरपुडा समारंभ पार पाडला आहे. ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य आणि अगदी जवळचे मित्र उपस्थित होते. आता दोन्ही कुटुंबांचे कोणतेही अधिकृत विधान समोर आलेले नाही आणि तेंडुलकर कुटुंबातील सूनेची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहेत. जिथे प्रत्येकाचे लक्ष तिच्या स्टाईलिश लूक आणि सौंदर्यावर अडकले होते.

लंदन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स मधून बिजनेस मॅनेजमेंटची पदवी मिळवलेली सानिया मुंबईत पेट सैलून, स्पा ‘मिस्टर पॉज’ची डिरेक्टर आहे, तिचा कौटुंबिक व्यवसाय देखील खूप मोठा आहे. इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि प्रीमियम आईस्क्रीम ब्रँड ब्रूकलिन क्रीमरीच्या मालकाची मुलगी केवळ अर्जुन पार्टनर होणार नाही आहे तर ती आधीपासूनच सारा तेंडुलकरची खूप चांगली मैत्रीण आहे. आणि, दोघी एकमेकांबरोबर बऱ्याच फोटोंमध्ये एकत्र दिसल्या आहेत. ज्यामध्ये हटके स्टायलिंग करण्याच्या बाबतीत ती सारालाही टक्कर देणारी आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या गाडीचा अपघात, बसच्या धडकेने चारचाकी गाडीच्या काचा फुटल्या आणि…; फोटो शेअर करत म्हणाली, “दुखापत…”

🚨 Saaniya Chandhok, Arjun Tendulkar's life partner is an 𝗲𝗻𝘁𝗿𝗲𝗽𝗿𝗲𝗻𝗲𝘂𝗿 and the founder of 𝗠𝗿. 𝗣𝗮𝘄𝘀 𝗣𝗲𝘁 𝗦𝗽𝗮 & 𝗦𝘁𝗼𝗿𝗲 𝗟𝗟𝗣, a Mumbai-based premium 𝗽𝗲𝘁 𝗴𝗿𝗼𝗼𝗺𝗶𝗻𝗴 and 𝗿𝗲𝘁𝗮𝗶𝗹 𝗯𝗿𝗮𝗻𝗱. She is also a certified Veterinary Technician. pic.twitter.com/vPLfT2Nkk9

— Indian Cricket & Venues (@INDCricketGuide) August 14, 2025

सानियाचे इन्स्टाग्राम खासगी असू शकते, परंतु सारा बर्‍याचदा तिचे फोटो तिच्याबरोबर शेअर करते. जिथे ती नेहमीच स्टाईलिश अवतारात दिसली आहे. क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि त्याची लेक सारा हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असतात, जरवेळेस ते चाहत्यांसाठी काही ना काही पोस्ट शेअर करत असतात. मात्र सचिनचा मुलगा अर्जुन आणि त्याची होणारी सून सानिया हे दोघे मात्र इन्स्टाग्रामवर फारसे ॲक्टिव्ह दिसत नाहीत.

आणखी वाचा – शहर, ग्रामीण भागातील दरी मिटवणारा ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित, कोकणातील लोकांचे स्वभाव उलगडत अनोखी कथा समोर

अर्जुनच्या इन्स्टाग्रामवर त्याचे बरेच फॉलोअर्स आहेत, मात्र तेथे त्याने आत्तापर्यंत फक्त ५५ पोस्टस टाकल्या आहेत. तर त्याची होणारी पत्नी सानिया हिला अर्जुन आणि सारा तेंडुलकर दोघेही इन्स्टाग्रावर फॉलो करतात. मात्र तिचं इन्स्टा अकाऊंट प्रायव्हेट आहे. तिचे एकूण ८०४ फॉलोअर्स असून तिने तिच्या अकाऊंटवर केवळ २६ पोस्ट केल्या आहेत.

Tags: arjun tendulkar fiancesachin tendulkarSara Tendulkar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
parag tyagi fulfilling shefali jariwala dream

शेफाली जरीवालाचे अपूर्ण स्वप्न नवऱ्याने केलं पूर्ण, नव्या पॉडकास्टद्वारे सांगणार अभिनेत्रीच्या मृत्यूदिवशी काय झालेलं

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.