शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “निवडणूक कोण जिंकणार?”, रितेशचा बायकोला थेट प्रश्न, जिनीलियाही उत्तर देत म्हणाली, “कोणीही जिंकलं तरी…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 16, 2024 | 1:24 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Riteish and Genelia Deshmukh shared a funny video on social media about the election 2024.

Video : “निवडणूक कोण जिंकणार?”, रितेशचा बायकोला थेट प्रश्न, जिनीलियाही उत्तर देत म्हणाली, “कोणीही जिंकलं तरी...”

हिंदी मनोरंजन विश्वासह मराठी कलाविश्व गाजवणारी सर्वांचीच आवडती जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलिया देशमुख. मराठीमधील एक आदर्श जोडपं म्हणून रितेश व जिनीलिया यांना ओळखले जाते. तसेच त्यांच्यातील नवरा-बायकोचा बॉण्ड हा नेहमीच खास असल्याचे येते. मनोरंजन सृष्टीत कायम चर्चेत असणारी ही जोडी सोशल मीडियावरदेखील तितकीच सक्रिय असते.

रितेश-जिनीलिया नेहमीच एकमेकांबरोबरचे अनेक रील-व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात आणि त्यांचे हे व्हिडीओ चाहत्यांनादेखील भलतेच आवडतात. अशातच रितेश-जिनीलिया यांनी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या असून या निवडणुकीचे निकालही समोर आले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

आणखी वाचा – Video : कुशल बद्रिकेने शेअर केला बायकोचा रियाज करतानाचा व्हिडीओ, म्हणाला, “मी मध्ये काही बोललो तर…”

याच पार्श्वभूमीवर रितेश व जिनीलिया यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे खास व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये रितेश जिनीलियाला “तुम्हाला काय वाटतं? यावेळी निवडणूक कोण जिंकणार?” असा प्रश्न विचारतो. यावर जिनीलियाही तिच्या खास अंदाजात उत्तर देते. रितेशच्या प्रश्नाला उत्तर देत जिनीलिया असं म्हणते की, “सरकार कुणाचंही येऊदे, तुमच्यावर तर नेहमीच माझेच राज्य असणार”. बायकोचे हे उत्तर ऐकताच रितेशच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. या खास व्हिडीओबरोबरच रितेशने या व्हिडीओच्या खाली कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे की, “अब की बार नही, हर बार बिवी की सरकार”.

आणखी वाचा – अखेर बाप-लेकाची भेट झाली, अमोलला भेटताच अर्जुन भावुक, कडकडून मिठी मारताच रडू लागला अन्…

दरम्यान, रितेश व जिनीलिया यांचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चंगलाच व्हायरल होत असून या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या व्हिडीओखाली चाहत्यांनी “खरी गृहमंत्री”, “घरातील होम मिनिस्टर”, “अब की बार, जिनीलिया सरकार” अशा अनेक कमेंट्स करत व्हिडीओला तूफान प्रतिसाद दिला आहे.

Tags: genelia deshmukhmarathi entertainment newsriteish deshmukhRiteish Genelia Funny Video
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Karishma Tanna supported her friend and she shared a post on her Instagram about Dalljiet Kaur's cheating allegations

“जे घडले ते...”, निखिल पटेलवर दलजीत कौरच्या मैत्रिणीचे गंभीर आरोप, म्हणाली, “या माणसाने तिच्यावर अन्याय...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.