मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याने आणि सालस अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. रेणूकांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सहज घडत गेला. परंतु रेणुका यांना त्यांच्या वयक्तिक आयुष्यात अनेक चढ उत्तर सहन करावे लागले. त्यातील एक गोष्ट म्हणजे त्यांच्या आई वडिलांचा घटस्फोट. त्यांच्या आईला आलेल्या अनुभवावरून त्यांनी रेणुका यांना लवकर लग्न करू नकोस असा सल्ला दिला होता. (Renuka Shahane Marriage Story)

रेणुका ह्या वयाने लहान असतानाच त्यांच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला. तेव्हा रेणुका त्यांच्या आई आणि भावासोबत आज्जीकडे राहायला गेल्या. परंतु रेणुकांना या गोष्टीची जाणीव करून देणारा समाजच होता. त्यानंतर रेणुका यांना सगळ्या गोष्टी समजायला लागल्या. काही काळानेच रेणुका यांच्या आईने दुसरा विवाह केला. रेणुका यांच्या आईचा हा निर्णय रेणुका आणि त्यांच्या आईने नीट विचार करूनच घेतला होता. परंतु रेणुका यांच्या आई सोबत असं झालं म्हणून आपण लग्न करू नये असं रेणुका यांना कधीच वाटलं नाही.
हे देखील वाचा: “नाहीतर तुला प्रयोगाला यायला मला बंदी घालावी लागेल” या कारणामुळे काशिनाथ घाणेकर यांना दादांनी दिला होता दम
रेणुका यांनी अठराव्या वर्षी विजय केंकरे यांच्या सोबत साखरपुडा केला आणि अवघ्या एकविसाव्या वर्षी लग्न केले. रेणुका आणि विजय यांच्या लग्नाला दोन्ही घरातून नकार होता. तसेच रेणुका यांच्या आईने रेणुका यांना आधी एम ए पूर्ण करण्याचा सल्ला दिला होता. परंतु रेणुका यांनी त्यांच्या आईचे काही ऐकले नाही. रेणुका यांचे असलेले कमी वय आणि त्यामुळे लग्नानंतर असलेल्या जबाबदारीची जाणीव नसल्याने त्यांनी ऐकलं नसावं.(Renuka Shahane Marriage Story)
हे देखील वाचा: शेफ होण्याआधी मामांचा मुलगा करत होता ‘हे’ काम
पुढे काही काळानंतर रेणुका आणि विजय यांचं पटलं नाही. आणि त्यांचा घटस्फोट झाला. रेणुका पुढे म्हणतात, जर मी माझ्या आईच वेळेतच ऐकलं असतं तर बार झालं असतं. कदाचित काही वर्षांनी आमची एकमेकांबद्दलची असलेली मते बदलली असती.
रेणुका यांनी आशुतोष राणा यांच्या सोबत पुन्हा लग्न गाठ बांधली असून, रेणूकांचा आता आशुतोष यांच्या सोबत सुखी संसार आहे.