मराठी मालिका विश्वात अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर करणारी मालिका ठरलीये. मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलेलं दिसतंय. मालिकेतील राज आणि कावेरीची भूमिका पार पाडणारे अभिनेता विवेक सांगळे, अभिनेत्री तन्वी मुंडले या नव्याकोऱ्या जोडीने प्रेक्षकाना वेड लावलं आहे. या नव्या जोडीच्या सोबतीला साथ लाभली ते अनुभवी अभिनेत्री निवेदिता सराफ यांची. ज्यांच्या अभिनयातील अनुभवाचा वापर पुरेपूर त्यांच्या अभिनयातून अनुभवता येतो. तर बऱ्याच संकटानंतर मालिकेमध्ये आता अखेर रत्नमाला या आजारातून बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. पण एक नवीन संकट रत्नमाला आणि राज कावेरीवर आलं आहे.(Ratnmala health issue)
रत्ननमाला यांच्या आजाराचा फायदा करून घेणं यामागे फक्त वैदेहीच डोकं नसून सानिया सुद्दा या गोष्टीत सामील आहे. ‘मी काहीही करून राजला तुला मिळवून देईन’ असं आश्वासन देऊन सानियाने ने आर्धी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. आणि राज कावेरीला त्रास देण्याचा हेतू ती आता पूर्ण करताना दिसत आहे. कधी राजला वैदेही कडे पाठवून, तर कधी कावेरीला पिज्जा बनवायला लावून नोकरांसारखं वागवण्याचा ध्यास सानियाने घेतल्याचा दिसून येत आहे.
====
हे देखील वाचा- पाडव्याला मटण? आदिनाथच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांचे प्रश्न
====
रत्नमाला यांचा जीव वाचवण्यासाठी राज ने वैदेहीच्या नावावर केलेली सगळी प्रॉपर्टी आणि त्यामागे सानियानाचा असणारा हात या सगळ्या गुंत्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असताना राज कावेरी पुढे आणखी एका संकटाच सावट पसरताना दिसतंय ते म्हणजे घडून गेलेल्या कोणत्याही गोष्टीची कल्पना नसणाऱ्या रत्नमाला मोहिते अचानक माहेरच्या चहाला भेट द्यायला निघतात. (Ratnmala health issue)

पण स्वतःच्या कॅबिन मध्ये पोहचल्यावर स्वतःच्या खुर्चीवर वैदेहीला मालकिणीच्या रूपात पाहून रत्नमाला याना धक्का बसतो. यात भर म्हणून सानिया तिथे येते आणि ते पाहून रत्नमाला मोहिते अजूनच टेन्शन मध्ये येतात. त्या दोघीं ना एकत्र पाहून, गेलेलया प्रॉपर्टी बाबत ऐकूनऐकून रत्नमाला पुन्हा चक्कर येऊन पडतात. तर आता पुढे रत्नमाला यांची प्रकृती पुन्हा बिघडणार का? वैदेही ने किडनी दिली आहे हे त्यांना समजणार का? आणि समजलं तर कथेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक दिसत आहेत.
=====
हे देखील वाचा- प्राजक्ता माळीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन!
====