रविवार, एप्रिल 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाची उत्सुकता, मिर्झा राजे जयसिंग यांच्या भूमिकेत दिसणार पुनीत इस्सर, लूक समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 2, 2026 | 3:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ranapati Shivaray Swari Agra

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाची उत्सुकता, मिर्झा राजे जयसिंग यांच्या भूमिकेत दिसणार पुनीत इस्सर, लूक समोर

Ranapati Shivaray Swari Agra : ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा मराठी ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भव्य आणि उत्कंठावर्धक अनुभव घेऊन येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाडसी आग्रा स्वारीवर आधारित हा चित्रपट केवळ कथा नाही, तर शौर्य, बुद्धिचातुर्य आणि राजकीय मुत्सद्देगिरीचा उत्कंठावर्धक अध्याय आहे. ‘पॅनोरमा स्टुडिओज’ आणि ‘मुगाफी’ निर्मित, तसेच दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपट ६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते पुनीत इस्सर एका महत्त्वपूर्ण ऐतिहासिक व्यक्तिरेखेत झळकणार आहेत. ते मिर्झा राजे जयसिंग या प्रभावशाली भूमिकेत दिसणार असून, त्यांच्या अनुभवी आणि भारदस्त अभिनयामुळे या व्यक्तिरेखेला एक वेगळेच परिमाण लाभले आहे. मिर्झा राजे जयसिंग ही व्यक्तिरेखा केवळ राजकीय सत्तेचे प्रतीक नसून, रणनीती, कूटनीती आणि सत्तासंतुलनाचा सूक्ष्म खेळ दर्शवणारी आहे.

आणखी वाचा – पत्नीच्या निधनानंतर पराग त्यागी कामावर परतले, अभिनेत्याला पाहून चाहते खुश, म्हणाले, “शेफालीच्या आत्म्याला शांती…”

View this post on Instagram

A post shared by Panorama Studios (@panorama_studios)

‘महाभारत’ मालिकेतील दुर्योधनासह अनेक संस्मरणीय भूमिकांमुळे ओळखले जाणारे पुनीत इस्सर या भूमिकेतून इतिहासातील या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाला प्रभावीपणे साकारताना दिसतील. भव्य सेट्स, सशक्त पटकथा आणि तगड्या कलाकारांच्या अभिनयामुळे हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा आणि संस्मरणीय टप्पा ठरणार आहे.

आणखी वाचा – “मला तुझे शरीर पाहायचे आहे…”, साऊथ अभिनेत्रीने सांगितला वाईट अनुभव, फोटोग्राफरची अश्लील मागणी अन्…

कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओज), विपुल अग्रवाल, जेनील परमार (मुगाफी), मुरलीधर छतवानी (पॅनोरमा स्टुडिओज) चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते रवींद्र औटी (पॅनोरमा स्टुडिओज), तान्शा बत्रा, आलोक शर्मा (मुगाफी) आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे. पॅनोरमा स्टुडिओज ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचे जगभरात (वर्ल्ड वाईड) वितरण करणार आहे.

Tags: marathi moviepunit issarRanapati Shivaray Swari Agra
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 air conditioner health risks
Lifestyle

AC Side Effects : उन्हाळ्यात AC चा अतिवापर आरोग्यासाठी घातक, थकवा, डोकेदुखी आणि…

एप्रिल 26, 2026 | 4:00 pm
 Arijit Singh Net Worth
Entertainment

आलिशान कार, अपार्टमेंट आणि…; बॉलिवूड गायकाकडे आहे करोडो रुपयांची मालकी, लाइव्ह कॉन्सर्टसाठी घेतो मोठी रक्कम

एप्रिल 26, 2026 | 11:00 am
Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
Next Post
Famous Bollywood actor makes allegations against his wife

घटस्फोट न घेताच दुसरं लग्न केलं अन्…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचे पत्नीवर गंभीर आरोप, धक्कादायक सत्य समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.