बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

राखी सावंतचं लग्न होण्याआधीच मोडलं, होणाऱ्या नवऱ्याचा नकार पण वचन देत म्हणाला, “पाकिस्तानची सून…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 31, 2025 | 12:12 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rakhi Sawant Marriage

राखी सावंतचं लग्न होण्याआधीच मोडलं, होणाऱ्या नवऱ्याचा नकार पण वचन देत म्हणाला, "पाकिस्तानची सून..."

Rakhi Sawant Marriage : ‘ड्रामा क्वीन’ आणि ‘बिग बॉस’ स्पर्धक राखी सावंत सध्या पुन्हा एकदा तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. यावेळी तिने पाकिस्तानची सून बनणार असल्याची इच्छा व्यक्त केली. तिच्याशी लग्न करण्यास तयार असलेल्या व्यक्तीचे नाव डोडी खान असल्याचं वर्णन केले जात होते, जो पाकिस्तानचा रहिवाशी असून तो एक अभिनेता आणि व्यावसायिक आहे. हे लग्न इस्लामिक कस्टममध्ये होईल असेदेखील राखी म्हणाली होती आणि लग्नानंतर ती भारतात रिसेप्शन पार्टीचे आयोजन करेल आणि नेदरलँड्स किंवा स्वित्झर्लंडला हनीमूनसाठी जाईल, असंही तिने म्हटलं होतं. पण लग्नापूर्वीच राखीचे हृदय तुटले आहे. कारण डोडी खानने राखीशी लग्न करण्यास नकार दिला आहे.

गुरुवारी रात्री, डोडी खानने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर व्हिडीओ अपलोड करुन हे स्पष्ट केले की तो राखीशी लग्न करणार नाही. यावर प्रतिक्रिया देताना, राखीने अश्रूंनी भरल्या डोळ्यांचा आणि हृदय तुटलेला इमोजी पोस्ट केला आहे. राखीच्या अनेक चाहत्यांनीही डोडीच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि भारतीय अभिनेत्रीच्या भावनांना दुखावल्याबद्दल त्याला जाब विचारला आहे. एका चाहत्याने लिहिले, “प्रथम विचार न करता प्रस्तावित करायचे होते? अरे, हे खूप वाईट आहे, आजकाल कोण कोणाची काळजी घेतं. राखीने माध्यमांची पर्वा न करता लग्न केले पाहिजे आणि आनंदी आयुष्य जगले पाहिजे, लोक नेहमीच टीका करतात”.

आणखी वाचा – भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली प्रियांका चोप्रा, राजामौलीच्या चित्रपटासाठी घेतले ‘इतके’ कोटी

View this post on Instagram

A post shared by Dodi Khan (@dodi_khan)

डोडी खान यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, त्यांनी राखीला लग्नासाठी प्रस्तावित केले असावे, परंतु तो लग्न करणार नाही. त्याने राखीचे कौतुक केले. यापूर्वी राखी सामोरी गेलेल्या अनेक अडचणींचा त्याने उल्लेखही केला. तो म्हणाला की तिच्या धाडसामुळे ती त्याला खूप आवडते. डोडी खान म्हणाला, “नमस्ते भारत आणि पाकिस्तान, मी डोडी खान आहे. काही दिवसांपूर्वी आपण सोशल मीडियावर माझा एक व्हिडीओ पाहिला असेल ज्यामध्ये मी राखी सावंतला लग्नसाठी मागणी घातली. मी त्यांना लग्नासाठी प्रस्तावित केले कारण मी त्यांना चांगले ओळखतो. जेव्हा मी त्यांना जाणून घेण्यास सुरुवात केली, तेव्हा मला वाटले की ती एक व्यक्ती आहे जी देवावर खूप प्रेम करते. त्यांनी आपल्या आयुष्यात बरेच चढ -उतार पाहिले आहेत, त्यांनी तिचे आईवडील गमावले. ती आजारी असताना तिच्याबरोबर होती. एक मुलगा त्यांच्या आयुष्यात आला, त्याने राखीबरोबर काय केले हे आपणा सर्वांना माहित आहे. ती बर्‍याच दु: खातून बाहेर आली आहे. तिने इस्लाम स्वीकारला, उमराहला गेली आणि तिचे नाव बदलले फातिमा. मला ते खूप आवडले म्हणून मी त्यांना प्रस्तावित केले”.

आणखी वाचा – रॅपर रफ्तार दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात, हळदी समारंभात होणाऱ्या पत्नीसह थिरकताना दिसला, व्हिडीओ समोर

तो पुढे म्हणाला, “परंतु, मला वाटते की हे लोकांना मान्य नाही, कारण मला बरेच संदेश आणि व्हिडीओ प्राप्त झाले आहेत आणि मी ते सहन करु शकत नाही. म्हणून, राखी जी, तुम्ही माझ्या चांगल्या मैत्रीण आहात आणि नेहमीच असाल. आपण माझी पत्नी होऊ शकत नाही, परंतु मी तुम्हाला वचन देतो की तुम्ही पाकिस्तानची सून व्हाल. मी माझ्या भावाशी तुमचं लग्न लावून देईन”.

Tags: bollywood newsrakhi sawantrakhi sawant marriage
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priyanka Chopra talk about virginity
Entertainment

“व्हर्जिनिटी एका रात्रीत संपते पण…”, प्रियांका चोप्राने केलेलं धक्कादायक विधान, स्त्रियांच्या सेक्स लाइफबाबत म्हणालेली…

जून 3, 2025 | 6:45 pm
Vaishnavi Hagawane Death
Social

वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय, साडी व पंखा ७१ किलो वजन पेलू शकेल का?, फॉरेन्सिक रिपोर्ट ठरणार महत्त्वाचे

जून 3, 2025 | 6:00 pm
Zepto News
Social

अन्न तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले आणि…; झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…

जून 3, 2025 | 4:23 pm
Actor Vibhu Raghav death
Entertainment

Video : कॅन्सरमुळे सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, लेकाला शेवटचं पाहताना ढसाढसा रडली आई, भावुक व्हिडीओ समोर

जून 3, 2025 | 3:50 pm
Next Post
Prasad Jawade wished his wife Amruta Deshmukh on her birthday

"तुला गुडबाय किस देणं, फोन करणं…", बायकोच्या वाढदिवसाला भरभरुन बोलला प्रसाद जवादे, म्हणाला, "तुझ्यासाठी माझं आयुष्य…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.