बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेली पाहायला मिळते. पापाराजी ही तिचे अनेकदा स्पॉट होतानाचे व्हिडीओ, फोटो शेअर करताना दिसतात. मात्र काही दिवसांपासून राखी सावंत ही सिनेसृष्टीत व सोशल मीडियावर सक्रिय नसलेली पाहायला मिळत आहे. कारण राखीच्या तब्येतीबाबत काही दिवसांपूर्वीच मोठी अपडेट समोर आली होती. राखीचा पूर्वाश्रमीचा पती रितेश सिंग याने अभिनेत्रीच्या तब्येतीबाबत मोठी घोषणा केली असल्याच समोर आलं होतं.(Rakhi Sawant Health Update)
राखी सावंत सध्या एका मोठ्या अडचणीतून जात आहे. काही दिवसांपूर्वी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्व चाचण्या झाल्यानंतर राखी सावंतला गर्भाशयाचा ट्यूमर असल्याचे आढळून आले. रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. राखीच्या तब्येतीबाबत तिचा पूर्वाश्रमीचा पती रितेशने माहिती दिली होती.
यानंतर आता रितेशने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केलेले आहेत. या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. राखी या आजारपणाच्या संकटातून बाहेर आलेली पाहायला मिळत आहे. रितेशने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये राखी काही उपचारिकांच्या मदतीने चालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र यावेळी राखीला खूप जास्त त्रास होत असल्याचे दिसून आलं. रितेशने हा व्हिडिओ शेअर करत ““मी खूप आनंदी आहे. राखी लवकरच आपल्यामध्ये असेल. आज तिला शस्त्रक्रियेनंतर चालताना पाहून खूप बरं वाटलं. ईश्वर आणि जनतेचे आभार,” असं म्हटलं आहे.
राखीच्या तब्येतीबाबत रितेशने माध्यमांसमोर भाष्य केलं. यावेळी बोलताना राखी म्हणाला, “राखीला सीक्रेट ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. मी सांगणार नाही कुठे ठेवलं आहे. तिच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आम्ही तिथे तिला ठेवलं आहे. जेव्हा ती रुग्णालयात होती तेव्हा तिच्यावर हल्ला झाला होता. तिला जीवे मारण्याचा हा प्रयत्न होता. पण आता राखीला डिस्चार्ज मिळाला आहे”.