मनोरंजन विश्वात ‘आधुनिक विश्वकर्मा’ म्हणून प्रसिद्ध असलेले कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी एन.डी. स्टुडिओ येथे गळफास घेत आत्महत्या केली. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यामुळे शोककळा पसरली. सुबोध भावे, महेश मांजरेकर, अभिजित पानसे, महेश कोठारे, प्रवीण तरडे यांच्या सह अन्य कलाकारांनी नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली. मनोरंजन विश्वासह राजकीय क्षेत्रातून देखील अनेक राजकीय व्यक्तिमत्वांनी सुद्धा हळहळ व्यक्त केली आहे.(Raj Thackeray on Nitin Desai Suicide)
राजकीय स्तरातून या राजकीय मंडळींनी वाहिली नितीन यांना श्रद्धांजली
नितीन देसाई यांच्या निधनानंतर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत नितीन यांना श्रद्धांजली वाहिली. ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी लिहिलं आहे “प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी अतिशय धक्कादायक व दुःखद आहे. त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाक्षेत्रातील एक नामांकित व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण श्रद्धांजली”.
प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी अतिशय धक्कादायक व दुःखद आहे. त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाक्षेत्रातील एक नामांकित व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/8ioVoBxYV6
— Supriya Sule (@supriya_sule) August 2, 2023
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्दा ट्विट करत नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली. ट्विट करत राज ठाकरे म्हणाले ” ज्येष्ठ कलादिगदर्शक आणि माझे स्नेही नितीन देसाई ह्यांच्या आत्महत्येच्या बातमीने मन सुन्न झालं. जवळपास ३० वर्ष हिंदी चित्रपटांच्या जगात एका मराठी कलाकाराने जी भव्यता आणि नजाकत उभी केली त्याला तोड नाही. कला दिग्दर्शकाच्या दृष्टीचा पैस हा मोठाच असावा लागतो आणि असा पैस असलेला माणूस आयुष्यात एका क्षणाला कमकुवत होतो, त्याला आयुष्यात पुढे काहीच दिसेनासं आणि तो इतका टोकाचा निर्णय घेऊ शकतो, हे अनाकलनीय आहे. नितीन हा धीराचा माणूस होता, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाणारा माणूस होता, त्यामुळे त्याने असा आत्मघातकी विचार का केला असेल ? त्याच्यावर ही वेळ कशामुळे आली असेल ह्याचा छडा लागला पाहिजे. असो,कोणावरही अशी वेळ येऊ नये हीच इच्छा. नितीन देसाईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली.(Raj Thackeray on Nitin Desai Suicide)
ज्येष्ठ कलादिगदर्शक आणि माझे स्नेही नितीन देसाई ह्यांच्या आत्महत्येच्या बातमीने मन सुन्न झालं. जवळपास ३० वर्ष हिंदी चित्रपटांच्या जगात एका मराठी कलाकाराने जी भव्यता आणि नजाकत उभी केली त्याला तोड नाही. कला दिग्दर्शकाच्या दृष्टीचा पैस हा मोठाच असावा लागतो आणि असा पैस असलेला माणूस… pic.twitter.com/tJjqeXeH4q
— Raj Thackeray (@RajThackeray) August 2, 2023
नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीसुद्धा ट्विट केलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विट करत लिहिलंय ” सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक श्री. नितीन देसाई यांच्या मृत्यूची बातमी खूप धक्कादायक आहे. कल्पकतेने नविनतम कलाकृती सादर करण्याची ईश्वरीय देणगी लाभलेल्या या गुणी व्यक्तिमत्वाची अशी “एक्झिट” संपूर्ण मनोरंजन आणि कला क्षेत्राचीच हानी आहे.”
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक श्री. नितीन देसाई यांच्या मृत्यूची बातमी खूप धक्कादायक आहे. कल्पकतेने नविनतम कलाकृती सादर करण्याची ईश्वरीय देणगी लाभलेल्या या गुणी व्यक्तिमत्वाची अशी "एक्झिट" संपूर्ण मनोरंजन आणि कला क्षेत्राचीच हानी आहे. #NitinDesai pic.twitter.com/maQFDsNq7w
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) August 2, 2023
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुद्धा नितीन देसाई यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली आहे ट्विट मध्ये चित्रा वाघ म्हणाल्या “सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आयुष्यातून घेतलेली अकाली एक्झिट धक्कादायक आहे. बिग बॅनर्स हिंदी चित्रपटातून लार्जर दॅन लाइफ पडद्यावर दाखविण्यासाठी भव्यदिव्य सेट्स उभारणाऱ्या नितीनजींच्या जाण्याने सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावला आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना त्यांच्या कुटुंबियांनाही या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो. ॐ शांती”(nitin desai suicide marathi news)
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आयुष्यातून घेतलेली अकाली एक्झिट धक्कादायक आहे.
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 2, 2023
बिग बॅनर्स हिंदी चित्रपटातून लार्जर दॅन लाइफ पडद्यावर दाखविण्यासाठी भव्यदिव्य सेट्स उभारणाऱ्या नितीनजींच्या जाण्याने सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावला आहे.
त्यांच्या आत्म्यास… pic.twitter.com/VA9ysP2eVH
भाजप नेते विनोद तावडे यांनी नितीन देसाई यांचा एक फोटो शेअर करुन ट्वीटमध्ये लिहिलं, ‘जीवनाचा अत्यंत सुंदर भव्य उभा केलेला ‘सेट’ अचानक उध्वस्त केलास मित्रा!’
जीवनाचा अत्यंत सुंदर भव्य उभा केलेला ‘सेट’ अचानक उध्वस्त केलास मित्रा! pic.twitter.com/XPglciNmQC
— Vinod Tawde (@TawdeVinod) August 2, 2023
पूर्वी मुलुंडला राहणारे नीतिन चंद्रकांत देसाई कालांतराने पवई येथे राह्यला आलेल्या देसाईचं पार्थिव मुलुंड येथील इस्पितळात ठेवण्यात आले असून उद्या त्यांचे जावई व मुलगी विदेशातून आल्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील….