अनेक राजकारण्यांवर याआधी चित्रपट आले आहेत तर काही चित्रपट यायच्या मार्गावर आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ठाकरे या चित्रपटानंतर आगामी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर देखील चित्रपट येणार आहे. पण सध्या चर्चा सुरु आहे मनसे अध्यक्ष्य राज ठाकरे यांच्यावर चित्रपट काढण्याच्या मुद्द्यावर.(Mahesh Manjrekar Raj Thackeray)
झी मराठी वाहिनी वर पुन्हा सुरु होत असलेला शो खुपते तिथे गुप्ते याच्या पहिल्या भागात राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्या संदर्भात वायरल होत असलेल्या प्रोमो मध्ये अवधूत ने राज ठाकरे यांना बायोपिक बद्दल विचारलेल्या प्रश्नावर राज स्टाईल मध्ये उत्तर दिले आहे.

पाहा नक्की काय म्हणाले राज ठाकरे?(Mahesh Manjrekar Raj Thackeray)
अवधूत ने राज ठाकरे यांना विचारले तुमच्या पक्षात महेश मांजरेकर, अमेय खोपकर, अभिजित पानसे असे उत्तम निर्माते, दिगदर्शक आहेत तरी तुमच्या वर चित्रपट काढावा असे कोणाला का वाटत नाही? त्यावर राज ठाकरे त्यांच्या स्टाईल मध्ये म्हणाले ” कदाचित माझ्यामध्ये तसं मटेरियल नसेल”. त्यावर अवधूत ने त्यांना आता तुमच्यावर वेब सीरिजचं काढा तुमचं आयुष्य इतकं मोठं आहे ते एका चित्रपटात न होता अनेक भागांमध्ये होतील असा सल्ला देखील दिला.
हे देखील वाचा – “तू जाऊन इडल्याचं विक” पहिल्या चित्रपटानंतर बॉलीवूड मध्ये आण्णा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुनील शेट्टींवर झालेली टीका
राज ठाकरे यांनी या मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. अनेक राजकीय घडामोडी, उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच्या आठवणी अशा अनेक मुद्यांवर राज ठाकरेंनी या कार्यक्रमाच्या मार्फत भाष्य केल्याचं दिसून येतंय. खुपते तिथे गुप्ते हा जारकर्म तब्बल १० वर्षांनी पुन्हा एकदा सुरु होत आहे. येत्या ९ जूनला या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रदर्शित होतोय. राज ठाकरे यांच्या सोबतच अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमात असणार असल्याच्या सर्वत्र रंगत आहेत.(Mahesh Manjrekar Raj Thackeray)