देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी व निता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरु झाली आहे. अनंत व त्याची भावी पत्नी राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन यावर्षी मार्चच्या सुरुवातीला गुजरातमधील जामनगरमध्ये झाले. यानंतर, दुसरे प्री-वेडिंग सेलिब्रेशन मे महिन्याच्या शेवटच्या आठवड़्यात एका आलिशान क्रूझवर इटली येथे झाले. त्यामध्ये बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या अनेक स्टार्सनी भाग घेतला. अशातच आता येत्या १२ जुलै रोजी अनंत अंबानी व राधिका मर्चंट कायमचे एकत्र येणार असून त्यांचा शानदार विवाहसोहळा पार पडणार आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. आज मामेरू सोहळ्यादरम्यान, मुकेश अंबानी आपल्या नातवाला गेटवर पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज दिसले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाने दोन प्री-वेडिंग फंक्शन्स आयोजित केल्या आहेत. आज अंबानी कुटुंबीयांच्या घरी मामेरू विधी पार पडला. या विधीमध्ये नीता अंबानी आपल्या आई आणि वहिनींना मिठाई खाऊ घालताना दिसल्या.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाने दोन प्री-वेडिंग फंक्शन्स आयोजित केल्या आहेत. आज अंबानी कुटुंबीयांच्या घरी मामेरू विधी पार पडला. या विधीमध्ये नीता अंबानी आपल्या आई आणि वहिनींना मिठाई खाऊ घालताना दिसल्या. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा भव्य विवाहसोहळा १२ ते १४ जुलै दरम्यान पार पडणार आहे. या लग्नाला बॉलीवूड स्टार्ससोबतच क्रीडा तसेच बिझनेस क्षेत्रातील अनेक दिग्गजही हजेरी लावणार आहेत.
आणखी वाचा – गुरुवारी मिथुन व कन्या राशींचे भाग्य उजळणार,नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होणार, व्यवसायातही होणार लाभ
मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकणार आहेत. १२ जुलै रोजी दोघांचे भव्य लग्न होणार आहे. यानंतर १३ जुलै रोजी दोघांचा शुभ आशीर्वाद सोहळा होणार आहे. १४ जुलै रोजी एका ग्रँड वेडिंग रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये जगभरातील व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी पाहुणे सहभागी होऊन या जोडप्याला शुभेच्छा देतील.