Radhika Apte Baby Bump Photoshoot : राधिका आपटेने काही दिवसांपूर्वी चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्री आई झाली आहे. आई झाल्यानंतर अभिनेत्रीने आठवड्यानंतर तिने आपल्या मुलीला स्तनपान करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. यानंतर आता तिने तिच्या बेबी बंपचे काही फोटो शेअर केले आहेत. तिने हे फोटोशूट ‘वोग मॅगझिन’साठी केले आहे, ज्याचे फोटो सध्या चर्चेत आले आहेत. राधिका आपटे गरोदरपणात जास्त पोस्ट करणे टाळताना दिसली. आता तिने प्रसूतीपूर्वी केलेल्या तिच्या जबरदस्त फोटोशूटची झलक दाखवली आहे. सध्या अभिनेत्रीच्या या मॅटर्निटी फोटोशूटची सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.
राधिकाने सांगितले की, गरोदरपणात तिचा बदललेला लूक स्वीकारण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला. ‘व्होग इंडिया’च्या हँडलवरुन प्रसिद्ध झालेल्या या फोटोंच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “काही वर्षांपूर्वी राधिका आपटेचे लग्न झाले आहे हे फार कमी लोकांना माहीत होते, पण आता काही काळापासून ती कमी आरक्षित राहायला शिकली आहे”. बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हल २०२४ दरम्यान ऑक्टोबरमध्ये तिच्या सिस्टर मिडनाईट चित्रपटाच्या रेड कार्पेट प्रीमियरमध्ये तिने तिच्या गरोदरपणाची घोषणा केली. यावेळी ती असं म्हणाली की, “मी दुसऱ्या दिवसापासून गरोदरपणाबाबत लोकांना सांगायला सुरुवात केली”.
आणखी वाचा – मोठा धक्का! ‘लापता लेडीज’ ऑस्कर २०२५ मधून बाहेर, भारतातील एकही चित्रपटाचा समावेश नाही
राधिका आपटेने या फोटोशूटचे एकूण आठ फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती धैर्याने उभी राहून कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राधिका बाळाला दूध पाजताना आणि गरोदरपणाच्या एका आठवड्यानंतर बेडवर बसून मीटिंगमध्ये सहभागी होताना दिसली होती. बाळाबरोबरचा फोटो शेअर करताना राधिकाने कॅप्शनमध्ये लिहिले होते, “जन्म दिल्यानंतर आमच्या छोट्या पाहुण्याबरोबरची पहिली भेट”. सोशल मीडियावर चाहत्यांनी राधिकाच्या या फोटोंचे कौतुक करत तिची हिंमत वाढवली आहे.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : अहिल्यादेवींसमोर येणार पारू-आदित्यच्या लग्नाचं सत्य?, दामिनीचा डाव साध्य होणार का?
मॅगझिनच्या शूटबद्दल बोलताना राधिका म्हणाली, “मुलाच्या जन्माच्या एक आठवडा आधी मी हे फोटोशूट केले आहे. सत्य हे आहे की त्या वेळी मी ज्या पद्धतीने बघितले ते स्वीकारण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला. मी स्वत: इतके वाढलेले वजन कधीच पाहिले नव्हते. माझे शरीर सुजले होते, माझ्या ओटीपोटात तीव्र वेदना होत होत्या आणि झोपेच्या कमतरतेमुळे प्रत्येक गोष्टीकडे माझा दृष्टीकोन बिघडला होता. आता आई होऊन दोन आठवडेही झाले नाहीत, माझे शरीर पुन्हा वेगळे दिसू लागले आहे”.