सध्या सिनेसृष्टीत एका मागोमाग एक जोड्या लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. लग्नाचा शाही थाटमाट हा विषय चर्चेत असतानाच आता आणखी एक बॉलिवूड सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी लग्नबंधनात अडकली आहे. अत्यंत पारंपरिक अंदाजात या जोडीचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला असून त्यांच्या लग्नानंतरचा पहिला फोटो समोर आला आहे. ही जोडी म्हणजे अभिनेत्री क्रिती खरबंदा व अभिनेता पुलकित सम्राट. क्रिती व पुलकित यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला असून लग्नामधील खास फोटो त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. (Pulkit Samrat Kriti Kharbanda Wedding)
पुलकित व क्रितीचे लग्न दिल्ली एनसीआरच्या मानेसर येथील ITC ग्रँड भारत येथे पारंपरिक पद्धतीने पार पडले. भारतीय पद्धतीने दोघांचा लग्नसोहळा पार पडला असल्याचं समोर आलं आहे. याआधी दोघांचा विवाहपूर्व कार्यक्रमही अगदी थाटामाटात पार पडला. १४ मार्च रोजी मेहंदी व संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने त्यांनी नूर झोरा यांच्या गिधा ग्रुपला बोलावून हळदी-संगीतचा दिमाखात कार्यक्रम पार पडला.
पुलकित व क्रितीच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर नवविवाहित जोडप्याने त्यांच्या शाही लग्नाचे पहिले फोटो त्यांच्या इन्स्टावर शेअर केले आहेत. पुलकित व क्रिती त्यांच्या भव्य लग्नात खूपच सुंदर दिसले. फोटोंमध्ये हे जोडपे त्यांच्या या खास क्षणाचा आनंद लुटताना दिसत आहेत. क्रितीने तिच्या लग्नात गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता आणि ती खूपच सुंदर दिसत होती. तर पुलकित ऑफ व्हाइट शेरवानीमध्ये खूप उठून दिसत होता. अभिनेत्याची शेरवानी खूपच खास होती. त्याच्या शेरवानीवर संस्कृतमध्ये मंत्र लिहिलेले पाहायला मिळाले.
आणखी वाचा – ‘तारक मेहता…’मधून किती कमावते बबिता?, मुनमुन दत्ताचं एका एपिसोडचं मानधन आहे तब्बल…
क्रिती व पुलकित यांच्या या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहेत. चाहते व बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दोघेही लग्नानंतर नवीन आयुष्याची सुरुवात करत असल्याने अनेकांनी अनेकांनी दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.