मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेते, अभिनेत्री हे अभिनय क्षेत्रात शून्यापासून आपली कारकीर्द सुरु करतात. अभिनय क्षेत्रात कोणताही कौटूंबिक आधार नसताना देखील आपल्या कलेच्या जोरावर एखादा कलाकार प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करतो. केवळ अभिनयानेच नाही तर सामाजिक क्षेत्रातील आपल्या कामगिरीने प्रेक्षकांची मनं जिंकणारा कलाकार म्हणजे अभिनेता सोनू सूद. नुकताच अभिनेता सोनू सूदचा वाढदिवस उत्साहात पार पडला. चाहत्यांच्या तुफान गर्दी मध्ये सोनू सूदचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आज अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेला अभिनेता सोनू सूद. आज कोठ्यावधींचा मालक असणारा अभिनेता सोनू सूद एकेकाळी केवळ ५००० रुपये घेऊन मुंबईमध्ये आला होता. आणि त्या पैशात त्याने आपल्या स्ट्रगलला सुरुवात केली. शहीद- ए – आझम या चित्रपटातून सोनू सूद ने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि आज तो जगभरात पोहचला.(sonu sood property)
मीडियाच्या एका रिपोर्ट नुसार आज सोनू सूद कडे अनेक कोठीची मालमत्ता आहे. सुरुवातीच्या काळात अभिनेता सोनू सूद ला अनेक अडचणींनाच सामना करावा लागला. बऱ्याच चित्रपटांमधून सोनुने खलनायकी पात्र साकारून प्रेक्षकांच्या मनात आपलं घर केलं. नायका इतकाच खलनायकाचा निर्माण होणारा प्रचंड चाहता वर्ग असणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सोनू सूदचा देखील समावेश होतो.

अनेक चित्रपट, वेब सिरीज, जाहिराती यांच्या मार्फत सोनू ने आता पर्यंत कोठ्यावधींची कमाई केल्याचं सांगितलं जात. एका रिपोर्ट नुसार अभिनेता सोनू सुदकडे तब्बल १३५ कोटींची मालमत्ता आहे. मुंबईतील लोखंडवाला येते भव्य घर सोबतच पोर्ष, ऑडी, मर्सडिज यांसारख्या महागड्या गाड्या या संपत्तीचा तो मालक आहे. एका चित्रपटासाठी तब्बल २ ते ३ कोटी रुपये मानधन सोनू आकारतो अशा चर्चा आहेत. सोनू लवकरचं बॉलीवूड मधील ‘फतेह’ तर साऊथ मधील ‘तामिलरासन’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.
हे देखील वाचा – किसींग सीन वरून होणाऱ्या टीकेवर धर्मेंद्र यांनी सोडलं मौन म्हणाले, “आम्हाला किसींग सीन करताना…”
अभिनय आणि समाजकार्य (sonu sood social work)
अभिनया व्यतिरिक्त सोनू सूद ओळखला जातो तो म्हणजे त्याच्या समाजप्रती असलेल्या भावनेबद्दल. कोरोना सारख्या महामारीत सोनुने जीवाची पर्व न करता अनेकांना मदत केली. शिवाय अन्नदान, रक्तदान शिबीर, गरजूना हवी ती मदत, अनाथ मुलांना योग्य राहणीमान आणि शिक्षण अशा अनेक गोष्टींमध्ये सोनूचा नेहमी पुढाकार असतो. सोनूचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला पण चाहत्यांकडून एका अनोख्या पद्धतीने सोनू सूदच्या वाढदिवसाचा सेलिब्रेशन करण्यात आलं.(sonu sood birthday)

गरजूंना मदत करण्याच्या सोनू सूदच्या अथक समर्पणाने प्रेरित होऊनत्याच्या चाहत्यांनी त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्तदान मोहीम आयोजित केली. जीवनाची ही अनमोल देणगी गोळा करण्यासाठी देशभरात तब्बल ८०० ते ९०० रक्त शिबिरे उभारण्यात आली आहेत. शिवाय रक्तदान मोहिमेव्यतिरिक्त काही वंचितांना अन्न दान करण्यासाठी कैक मैल दूर जाणार आहेत.(sonu sood social work)