Pritish Nandy Passed Away : मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे ती म्हणजे, प्रसिद्ध चित्रपट निर्माते, कवी आणि लेखक प्रितिश नंदी यांचे निधन झाले. प्रितिश यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाची माहिती अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर दुःखद पोस्ट शेअर करत नंदी यांच्या निधनाबद्दलची माहिती दिली आणि शोक व्यक्त केला. अनुपम खेर2यांनी नंदी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत एक मोठी पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टमधून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Pritish Nandy Passed Away)
अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटरवरील पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “माझ्या सर्वात प्रिय आणि जवळच्या मित्रांपैकी एक प्रीतीश नंदी यांच्या निधनाबद्दल मला खूप दुःख झाले आणि मोठा धक्का बसला. एक अद्भुत कवी, लेखक, चित्रपट निर्माते आणि एक धाडसी आणि अद्वितीय संपादक आणि पत्रकार, माझ्या मुंबईतील सुरुवातीच्या काळात ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आम्ही अनेक गोष्टी शेअर केल्या”.
Deeply deeply saddened and shocked to know about the demise of one of my dearest and closest friends #PritishNandy! Amazing poet, writer, filmmaker and a brave and unique editor/journalist! He was my support system and a great source of strength in my initial days in Mumbai. We… pic.twitter.com/QYshTlFNd2
— Anupam Kher (@AnupamPKher) January 8, 2025
आणखी वाचा – प्राजक्ता माळीची ज्योतीर्लिंग यात्रेला पुन्हा सुरुवात, शेअर केले मंदिरातील खास फोटो, म्हणाली, “पुन्हा सुरु…”
यापुढे अनुपम असं म्हणाले की, “मी भेटलेल्या सर्वात निडर लोकांपैकी ते एक होते. आयुष्यापेक्षा नेहमीच मोठे. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. काही काळ आमची अनेकदा भेट होत नव्हती. पण एक काळ असा होता की, आम्ही एकत्र होतो. जेव्हा त्यांनी मला फिल्मफेअरच्या मुखपृष्ठावर आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे द इलस्ट्रेटेड वेल्कीच्या मुखपृष्ठावर पाहून मला आश्चर्य व्यक्त केले होते ते मी कधीही विसरणार नाही. मित्रांचा मित्र अशी त्यांची खरी व्याख्या होती. मित्रा, मला तुझी आठवण येईल. मात्र आता जिथे कुठे असाल तिथे विश्रांती करा”.
आणखी वाचा – 09 January Horoscope : मेष, वृषभ व मकर राशीच्या लोकांना गुरुवारी चांगली बातमी मिळेल, जाणून घ्या…
दरम्यान, प्रितिश नंदी यांच्याबद्दल जाणून घ्यायचे म्हटल्यास, ते एक पत्रकारदेखील होते. १९९० च्या दशकात दूरदर्शनवर ‘द प्रितिश नंदी शो’ नावाचा टॉक शो होस्ट केला होता. या शोमध्ये त्याने सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतल्या. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी प्रितिश नंदी कम्युनिकेशन्सच्या बॅनरखाली ‘सूर’, ‘कांटे’, ‘झंकार बीट्स’, ‘चमेली’, ‘हजारों ख्वैशीं ऐसी’, ‘प्यार के साइड इफेक्ट्स’ सारखे अनेक चित्रपट बनवले होते. याशिवाय त्यांच्या कंपनीने ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ आणि ‘मॉडर्न लव्ह मुंबई’ या अँथॉलॉजी या यशस्वी सीरिजची निर्मितीही केली आहे.