शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : मन्नारा चोप्रासाठी घाणेरडे शब्द वापरताच प्रियांका चोप्राची आई भडकली, अंकिता लोखंडे, इशा मालवीयला म्हणाली, “किती रानटी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 20, 2024 | 1:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss 17 Latest News

मन्नारा चोप्रासाठी घाणेरडे शब्द वापरताच प्रियांका चोप्राची आई भडकली, अंकिता लोखंडे, इशा मालवीयला म्हणाली, "किती रानटी…"

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’मध्ये सध्या जोरदार वाद सुरु असलेले पाहायला मिळत आहेत. स्पर्धकांमधील ही चुरशीची लढत अधिकच तीव्र होताना दिसत आहे. अशातच ‘बिग बॉस’च्या १७व्या सिझनचा फिनालेही जवळ आलेला पाहायला मिळत आहे. टीम ए व टीम बी यांच्यात रंगलेल्या टास्कदरम्यान दोघांमध्ये चांगलीच लढत पाहायला मिळाली. टॉर्चर टास्कदरम्यान टीम ए ने टीम बी वर मात करत विजय पटकावला. यामुळे टीम ए म्हणजेच मुन्नवर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार व अरुण माशेट्टी हे स्पर्धक फिनालेमध्ये गेले.

तर दुसऱ्या टीममधील अंकिता लोखंडे, विकी जैन, इशा मालवीय व आयेशा खान यांचा पराभव झाला. टॉर्चर टास्कमध्ये मुन्नवरच्या टीमला अंकिताच्या टीमने खूप टॉर्चर केलं. लाल मिरची पावडर त्यावर पाण्याचा फवारा मारत स्पर्धकांना अक्षरशः घायाळ केलं. त्यावेळी जेव्हा काही वस्तू मुन्नवरने त्याच्या जॅकेटमध्ये लपवल्या तेव्हा दोन्ही टीममध्ये जोरदार वाद झाला. मुन्नवरने वस्तू जॅकेटमध्ये लपवल्यावर मनारा त्याचं संरक्षण करताना दिसली.

आणखी वाचा – “तुमच्या कामाचं…”, विमानप्रवासादरम्यान इंडिगो कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केलेलं कौतुक पाहून भारावली शिवानी रांगोळे, म्हणाली, “तुमच्या…”

View this post on Instagram

A post shared by Mannara❤️ (@memannara)

यावेळी अंकिता, विकी, आयेशा व इशाने मन्नारासाठी अपशब्द वापरले व घाणेरड्या भाषेत तिच्यावर टीका केली. अंकिता लोखंडे, विकी, आयेशा व इशाने मन्नाराला ज्याप्रमाणे टास्कमध्ये टॉर्चर केलं, तिच्यासाठी वाईट शब्द वापरले त्याबद्दल नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळाली. या एपिसोडनंतर सोशल मीडियावर अंकिता, विकी, इशा व आयेशाला खूप ट्रोल करण्यात आलं. दरम्यान अनेकांनी मन्नाराचं समर्थन केलं.

आणखी वाचा – सानिया मिर्झासह घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्रीशी केलं लग्न, विवाहसोहळ्याचा पहिला फोटो समोर

या टॉर्चर टास्कवर चाहत्यानांतर आता प्रियांका चोप्राच्या आईची प्रतिक्रियाही समोर आली आहे. मन्नाराच्या इन्स्टाग्रामवर या भांडणाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “सर्वांना लाज वाटली पाहिजे. आम्ही याला खेळ म्हणत नाही. आम्ही आता प्रत्येकाची खरी बाजू पाहत आहोत” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओवर मन्नाराची मामी व अभिनेत्री प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी कमेंट करत “देवा.यांचं वागणं किती रानटी आहे”, असं म्हणत भाचीला पाठिंबा दर्शविला आहे.

Tags: ankita lokhande fightbigg bossbigg boss 17entertainmentmadhu chopra reactionmannara chopra
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Actress Gautami Deshpande shared her previous office party’s photo and video on Instagram story see the details

अभिनयक्षेत्रात काम करण्यापूर्वी गौतमी देशपांडे करायची नोकरी,  त्याच ऑफिसमध्ये पुन्हा गेली अन्...; स्वतःचा डेस्कही दाखवला, म्हणाली, "पाच वर्ष..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.