नव्वदीच्या काळात रुपेरी पडदा गाजवणाऱ्या जोडींपैकी एक नाव म्हणजे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे. लक्ष्मीकांत बेर्डे यांना सगळेच लक्षा म्हणूनच आवाज देतात. आज आपल्या सर्वांचा लाडका लक्षा जरी आपल्यात नसला तरी प्रत्येक क्षणोक्षणी त्याची आठवण आल्या वाचून राहत नाही. आज प्रिया बेर्डे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत असून कलाकारांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी सोडवण्याच्या उद्देशाने ते या कार्यक्षेत्रात अद्याप कार्यरत आहेत. याबाबत बोलताना प्रिया बेर्डे म्हणाल्या, ‘माझ्या घराचा खूप मोठा अभिनयाचा वारसा आहे. घरातील सर्वांचं मी काम बघितलेलं आहे वडील तर बॅक आर्टिस्टना नेहमी मदत करत असायचे. एवढेच नाही तर लक्ष्मीकांत यांनी सुद्धा कोल्हापूरमध्ये या बॅक आर्टिस्ट साठी एक संस्था उभारली होती. (Priya Berde Lakshmikant Berde)
‘लक्ष्यकला मंच’ या माध्यमातून बॅक आर्टिस्टला मदत केली जाते. त्यामुळे मलाही वाटतं की या कलाकारांसाठी आपण कुठेतरी काम करायला हवं. चित्रपटातून काम करत असताना कलाकारांना वेगळी आणि बॅक आर्टिस्टना वेगळी वागणूक दिली जाते. हे हात एवढं मोठं अवजड समान आपल्या खांद्यावर नेऊन डोंगर दऱ्या सर करत असतात. पण जेवणाच्या वेळी कलाकारांना चांगलं जेवण आणि या काम करणाऱ्या हातांना अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण दिलं जातं. मी यावर नेहमी आवाज उठवला आहे. कित्येकांशी मी भांडले सुद्धा आहे, यामुळे प्रिया बेर्डे खूप त्रास देतात म्हणून मला त्यांनी नावं देखील ठेवली आहेत. अरे पण का त्रास देते हे तुम्ही जाणून घ्या ना. या स्पॉट बॉईजना, मेकअप आर्टिस्टना पुरेपूर आणि योग्य आहार मिळावा म्हणून मी ही मागणी केलेली आहे.
पहा का भडकल्या प्रिया बेर्डे (Priya Berde Lakshmikant Berde)
मला ह्याची जाणीव कोरोनाच्या काळात प्रकर्षाने जाणवली. या काळात तर कलाकारांचे खूप हाल झाले. लोक कलावंतांना तर लोकांच्या घरची धुणीभांडी करण्याची कामं करावी लागली. कितीतरी वृद्ध कलाकारांना पेन्शन मिळत नाही. नाट्यगृहांची तर अतिशय वाईट अवस्था आहे अनेकदा मेकअप रूमला कड्याच नसतात, सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलेलं असतं. या सर्वांसाठी मला एक कुठेतरी ठोस पाठिंबा हवा होता म्हणून मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. मी हे आतापासूनच नाही करत मला कुठेतरी प्रसिद्धी मिळावी म्हणून मला हे नाही करायचं, मी अगोदरच प्रसिद्धी मिळवलेली आहे. माझ्या पाठीमागे जे नाव लागलेलं आहे ते नाव खूप मोठं आहे. ह्या नावाला जपून मला माझं काम करायचं आहे. या माणसाने अख्ख्या महाराष्ट्राला हसवलं आहे. या माणसाबद्दलही काही काही चुकीच्या गोष्टी बोलल्या जातात.(Priya Berde Lakshmikant Berde)
हे देखील वाचा – शाहीर साबळेंच्या दुसऱ्या पत्नी भावुक, केदार शिंदेंची पोस्ट लक्षवेधी
लोकं मागून नावं ठेवतात. १८ ,१९ वर्षे झाली त्या माणसाला जाऊन एवढं मोठं काम आहे त्या माणसाचं. एवढं कसं लोक त्यांच्याबद्दल वाईट बोलू शकतात. मला बोला, मला ट्रोल करा, बेर्डे साहेबांना बोलण्याचा काय अधिकार आहे तुमचा. या मानसिकतेवर काय बोलावं हेच कळत नाही मला. लोकांना आमच्या चांगल्या गोष्टी दिसतच नाहीत ही शोकांतिका आहे. ” पुढे प्रिया बेर्डे असेही म्हणाल्या की, ” मी आणि लक्ष्मीकांत निवेदन घेऊन जायचो की आम्हाला या कलाकारांसाठी काहीतरी काम करायचंय त्यांच्यासाठी संस्था सुरू करायची, कारण आज मुंबईत मोठमोठ्या अभिनय कार्यशाळा आहेत. २५ लाख फी असलेल्या या अभिनय कार्यशाळेच्या फी मुलांना कशा परवडतील.
पहा काय म्हणाल्या प्रिया बेर्डे (Priya Berde Lakshmikant Berde)
आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक हरहुन्नरी कलाकार तुम्हाला पाहायला मिळतील. या कलाकारांना व्यासपीठ मिळावं ही आमची इच्छा होती. लक्ष्मीकांत शेवटच्या स्टेजवर होते त्यांना माहीत होतं की मी जगणार नाही, मी काही दिवसांचाच सोबती आहे हे माहीत असूनदेखील या कलाकारांसाठी काहीतरी करण्याची त्यांची तळमळ होती. पण दुर्दैवाने ते घडलं नाही. पण मग लक्ष्यकलामंच या फाउंडेशनची स्थापना केली जेणेकरून या माध्यमातून तरी कलाकारांना त्याचा फायदा होईल. यासाठी मला तुम्हा सगळ्यांची साथ हवी आहे एवढेच नाही तर मला मीडियाची देखील साथ हवी आहे. तुम्हा सगळ्यांची साथ हवी आहे. या सांस्कृतिक क्षेत्राची कुठेच दखल घेतली जात नाही पण मला आता यांच्यासाठी काम करायचं आहे.” असं म्हणत त्यांनी बॅकसतेज आर्टीस्टसाठीची त्यांची तळमळ व्यक्त केली आहे.
