शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ट्रेंड फॉलो करतो तसे नियम पाळले तर?”, ट्रेंड फॉलो करण्यावरुन प्रथमेश परबच्या पत्नीचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत, म्हणाली…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 17, 2025 | 3:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Google Gemini AI trend

"ट्रेंड फॉलो करतो तसे नियम पाळले तर?", ट्रेंड फॉलो करण्यावरुन प्रथमेश परबच्या पत्नीचा 'तो' व्हिडीओ चर्चेत, म्हणाली…

Google Gemini AI trend : सोशल मीडिया हे माध्यम इतकं प्रगत झालं आहे की, एखादा ट्रेंड जरा हायलाईट झाला की तो वाऱ्यासारखा पसरलाच म्हणायला हवा. सध्या सर्वत्र गुगल जेमिनीवरील एक ट्रेंड चर्चेत आला आहे. Banana Al Saree ट्रेंडने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. समस्त महिलावर्ग अगदी हा नियम असल्याप्रकारे ट्रेंड फॉलो करत ते जनरेट केलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. केवळ सर्वसामान्य नागरिकच नव्हेतर अनेक कलाकार मंडळीही हा ट्रेंड आवर्जून फॉलो करताना दिसले. अनेक कलाकारांनी त्यांचे या ट्रेंडनुसार जनरेट झालेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या ट्रेंडबाबत अभिनेता प्रथमेश परबची पत्नी क्षितिजा घोसाळकरने खास व्हिडीओ शेअर केला आहे.

Banana Al Saree ट्रेंड मधील एक फोटो क्षितिजाने व्हिडीओत वापरला असून त्या व्हिडीओद्वारे तिने म्हटलं आहे की, “कव्हर फोटोवरुन तुम्हालाही असं वाटलं असेल की, मी हा ट्रेंड फॉलो केला आहे की काय? पण माझ्या मित्रांनी माझे अनेक छान छान फोटो एडिट करुन पाठवले आहेत. त्यामुळे मला तरी हा ट्रेंड प्रचंड आवडला आहे. एखाद्या फोटोशूटसारखे कमाल फोटो या ट्रेंडमधून पाहायला मिळत आहेत. पण या ट्रेंडच्यानिमित्ताने एक किस्सा मी शेअर करणार आहे”.

आणखी वाचा – मोठी घोषणा! नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील रिटायरमेंटबाबत नाना पाटेकर व्यक्त, म्हणाले, “त्या खुर्चीला चिकटून…”

View this post on Instagram

A post shared by Kshitija Ghosalkar Parab (@miles_in_style)

यापुढे क्षितीजा म्हणाली, “मी ऑफिसवरुन घरी येण्यासाठी स्टेशनवर पोहोचले. खूप पाऊस होता. त्यामुळे थोडा वेळ रेल्वे स्टेशनवर बसले होते. तर माझ्या बाजूला दोन कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली बसल्या होत्या आणि त्यांच्यात सध्याचे ट्रेंड, फोटो, व्हिडीओ आणि ते एडिट कसं करायचे? याबद्दल गप्पा सुरु होत्या. तेवढ्यात त्यांची ट्रेन आली आणि ती पकडण्यासाठी त्या धावत गेल्या. त्यांच्या हातात एक कुरकऱ्यांचं पाकीट आणि छोटी कोल्ड्रिंक्सची बॉटल होती. दोन्ही संपलेले होतं. तर त्या जिथे बसलेल्या होत्या, तिथेच एक कचराकुंडी होती, जिथे त्या कचरा टाकू शकल्या असत्या. पण त्यांनी ते न करता प्लॅटफॉर्मवरच कचरा टाकून ट्रेन पकडून निघून गेल्या”.

यापुढे क्षितीजा सांगते, “हे सगळं बघून मला असं वाटलं की, आपण सोशल मीडियावरचे कुठलेही ट्रेंड्स फॉलो करतो, तसंच आपण काही नियम पाळले तर? म्हणजे अगदी सोपं की, कुठेही कचरा न फेकणं, वाहतुकीचे नियम पाळणे आणि कुणालाही दिलेली वेळ पाळणे किंवा आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही, इतके साधे नियम जरी पाळले तरी खूप आहे. पण नाही… सोशल मीडियावर कुल दिसण्यासाठी आणि आपल्याला ते ट्रेंड्स आधी फॉलो करायचे आहेत”.

आणखी वाचा – ‘तू बोल ना’ गाण्यातून अनुभवायला मिळणार प्रेमाचा प्रवास, ‘मना’चे श्लोक’मधील प्रेमगीत घेतंय मनाचा ठाव

ती पुढे म्हणाली, “विचार करा, आपण सोशल मीडियावरील ट्रेंड्स ज्या वेगाने फॉलो करतो, तेवढ्याच वेगात आपण आपल्या खऱ्या आयुष्यातील सोपे सोपे नियम पाळले तर? आपल्यामुळे देशही कुठच्या कुठे जाईल. पण फरक इतकाच आहे की, सोशल मीडियावर ते व्हायरल नाहीत ना”. क्षितीजाच्या या व्हिडीओवर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Tags: gemini promptGoogle Gemini AI trendkshitija ghosalkar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Father
Entertainment

अक्षय केळकरचे वडील आजही चालवतात रिक्षा, रिक्षाचालक आणि मराठी वादाबाबत म्हणाले, ” इथे कमवता आणि…”

एप्रिल 24, 2026 | 4:39 pm
kashmira kulkarni injured leg
Entertainment

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

एप्रिल 24, 2026 | 1:55 pm
Sunita Ahuja viral video
Entertainment

गोविंदा आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा बिनसलं, समोर आलेल्या व्हिडीओने झालं स्पष्ट, Video व्हायरल

एप्रिल 24, 2026 | 12:55 pm
Gayatri Datar Wedding
Entertainment

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

एप्रिल 24, 2026 | 11:51 am
Next Post
Leena Bhagwat and Mangesh Kadam children decision

संसाराची १३ वर्ष, मुलं न होऊ देण्याचा निर्णय अन्…; लीना भागवत व मंगेश कदम यांचा मोठा खुलासा, म्हणाले…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.