देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (९ जून) रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली असल्यामुळे एकीकडे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असतानाच लगेच आज देशवासीयांसाठी एक दु:खद बातमी समोर येत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी रविवारी वैष्णोदेवी यात्रेकरूंच्या बसवर गोळीबार केला. दर्शनासाठी वैष्णोदेवीकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या बसवर रविवारी हा हल्ला झाला. ९ जूनला झालेल्या या हल्यात १० जण ठार झाले आहेत. रियासी जिल्ह्यातील शिवखोडी या तिर्थस्थळावरुन परत येत असलेल्या बसवर रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता दहशतवाद्यांनी गोळीबार केला.
या हल्ल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे बस दरीत कोसळली. या दुर्देवी घटनेमध्ये १० जणांचा मृत्यू झाला तर ३३ जण जखमी झाले आहेत. पोनी परिसरातील तेरायथ गावाजवळ ही घटना घडली. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेतली अन् स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य केले. या दुर्दैवी घटनेनंतर सोशल मीडियासह सर्वच प्रसार माध्यमांमध्ये याबद्दलच्या अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनेकांनी आपला राग व द्वेष व्यक्त केला आहे.

आणखी वाचा – “मालिकांच्या चढाओढीमुळे शीर्षकगीतांचा बळी…’’, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “एक एक सेकंदही…
याबद्दल लोकप्रिय मराठी गायक गायिका प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांनीही आपला राग व्यक्त केला आहे. वैष्णोदेवी दहशतवादी हल्ला प्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुग्धा व प्रथमेश यांनी राग व्यक्त केला आहे. काही दिवसांपासून “All Eyes On Rafah”च्या संदर्भातली एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. याच पोस्टशी संबंधित “All Eyes On Vaishnodevi Attcak” अशी पोस्ट मुग्धा व प्रथमेश यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत याबद्दल राग व्यक्त केला आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील भाविकांना घेऊन ही बस शिवखोडी मंदिरापासून कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिराकडे जात होती. याचवेळी पोनी परिसरातील तेरायथ गावाजवळ संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास दहशतवाद्यांनी या बसवर हल्ला केला. गोळीबारानंतर चालकाचे नियंत्रण सुटले अन् ५३ आसनी ही बस खोल दरीत कोसळली.