हास्यवीर प्रभाकर मोरे प्रेक्षकांना नेहमीच खळखळून ठेवण्यात व्यस्त असतात. महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील प्रभाकर मोरे यांचे आगळेवेगळे पात्र रसिक प्रेक्षकांचा नेहमीच पसंतीस पडते. कोकणवासी असलेल्या प्रभाकर मोरेंनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. सांस्कृतिक पदाच्या विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी प्रभाकर मोरे सांभाळत आहेत. (prabhakar more dance)
प्रभाकर मोरे यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये विनोदी आणि सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची नेहमीच विशेष पसंती मिळते. प्रभाकर मोरे हे आपल्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात.
====
हे देखील वाचाच-‘आपण हिंदी च अनुकरण budget मध्ये करतो का???’ शशांकने मांडले परखड मत
====
अशातच प्रभाकर मोरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी काही फॉरेनर्सला सोबत घेऊन एक डान्स केला आहे. आणि या डान्समधील गाणं हे त्यांनी स्वतः गायला आहे. ‘अगं शालू झोका दे ग मैना’ या कोकणातल्या नमणावर त्यांनी फॉरेनर्सला थिरकायला लावले आहे. कोकणची लोकधारा जपत प्रभाकर मोरे यांनी थेट फॉरेनर्सलाच थिरकवले आहे. त्यांच्या या परफॉर्मन्सची हवा सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. (prabhakar more dance)

पहा कोणत्या गाण्यावर प्रभाकर मोरे थिरकले – (prabhakar more dance)
‘पांघरुण’, ‘टकाटक’, ‘कुटुंब’, ‘कट्टी बट्टी’, ‘बाई गो बाई’, ‘भाई-व्यक्ती की वल्ली’, ‘धोंडी चम्प्या – एक प्रेमकथा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. तसेच कॉमेडीची बुलेट ट्रेन, महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमांमधील प्रभाकर मोरे यांच्या विनोदी शैलीला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरलं. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यात हा कार्यक्रम अगदी यशस्वी ठरला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. (prabhakar more dance)
याशिवाय प्रभाकर मोरे ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ या मालिकेमध्येही पाहायला मिळतोय. या मालिकेत प्रभाकर मोरे यांच्यासह समीर चौघुले, दत्तू मोरे, वनिता खरात, शिवाली परब या कलाकारांना पाहणं रंजक ठरतंय. कोकणचा वारसा पुढे नेत प्रभाकर मोरे नेहमीच काही ना काही रसिकांच्या भेटीस घेऊन येत असतात. प्रभाकर मोरे यांचे चाहतेही त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात. तर तुम्हाला प्रभाकर मोरे यांचा हा डान्स आवडला का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.