काही दिवसांपूर्वी बहुचर्चित व वादग्रस्त रिऍलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’ चे दुसरे पर्व पार पडले होते. आता बॉलिवूडचा भाईजान सलमान खान ‘बिग बॉस’चा १७वं पर्व घेऊन छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच या शोचा प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये सलमान खान वेगवेगळ्या अंदाजात पाहायला मिळत आहे. (Bigg Boss 17 Promo Out)
छोट्या पडद्यावरील या रिऍलिटी शोने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. हा शो जितका चर्चेत असतो, तितकाच तो वादातही अडकलेला आहे. असं असूनही, चाहते या शोची दरवर्षी मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच कलर्स वाहिनीच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाउंटवर या शोचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामध्ये शोचा सूत्रसंचालक सलमान खान तीन वेगवेगळ्या अवतारात दिसून आला आहे. या प्रोमोनुसार, यंदाच्या पर्वात बिग बॉस तीन वेगवेगळे अंदाजात दिसणार आहेत. ज्यात प्रेम, बुद्धी आणि दम हे बिग बॉसचे तीन अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
हे देखील वाचा – ‘होम मिनिस्टर’ला १९ वर्ष पूर्ण, आदेश बांदेकरांनी मानले प्रेक्षकांचे आभार, म्हणाले, “मागे वळून बघताना…”
हा व्हिडिओ पोस्ट करताना वाहिनीने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, “यावेळी बिग बॉस एक वेगळा रंग दाखवणार, जे पाहून तुम्ही सगळे चकित व्हाल.” या प्रोमोवर चाहत्यांच्या अक्षरशः प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. ते या शोच्या आगामी पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहे.
हे देखील वाचा – “सुशिक्षित आहेस ना?”, नो एन्ट्रीमधून जाणाऱ्यावर भडकला जितेंद्र जोशी, म्हणाला, “तू वागतो ते…”
अभिनेता सलमान खान गेली अनेक पर्व या शोचे सूत्रसंचालन करत आहे. त्याच्या सूत्रसंचालनाची एक वेगळी फॅन फॉलोविंग निर्माण झालेली आहे. दरम्यान, या शोमध्ये कोणते सेलेब्रिटी सहभागी होणार आहे, हे अदयाप समोर आले नाही. तरी यंदाच्या पर्वात अनेक रिअल लाईफ कपल सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर ‘बिग बॉस ओटीटी’ च्या मागील पर्वातील काही चेहरेसुद्धा यंदाच्या पर्वात सहभागी होणार असल्याची शक्यता आहे.