सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“देशात मांसाहारावरच बंदी आणा”, शत्रुघ्न सिन्हांचं मोठं विधान, म्हणाले, “फक्त गोमांसच नाही तर…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 6, 2025 | 11:58 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shatrughan Sinha demanded ban meat in India

“भारतात मांसाहारावर बंदी घालावी”, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मागणी

ज्येष्ठ अभिनेते आणि अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा हे त्यांच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. शत्रुघ्न सिन्हा बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहेत. पण ते आजही त्यांच्या जुन्या चित्रपटांमुळे, त्यांच्या भाषणामुळे प्रसिद्धीच्या झोतात असतात. त्यांनी चित्रपटांपासून स्वतःला दूर केले आणि राजकारणाचा मार्ग स्वीकारला. शत्रुघ्न हे अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत. अलीकडेच त्यांनी मांसाहारावर बंदी घालण्याची मागणी केली. मंगळवारी संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना त्यांनी भारतात मांसाहारावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली. उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिताच्या अंमलबजावणीचे कौतुक करताना त्यांनी देशभरात कायद्याच्या गुंतागुंतीही अधोरेखित केल्या. (Shatrughan Sinha demanded ban meat)

संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना शत्रुघ्न सिन्हा मांसाहाराविषयी असं म्हणाले की, “देशाच्या अनेक भागात गोमांसावर बंदी घालण्यात आली आहे. मला वाटतं की, देशात फक्त गोमांसच नाही तर सर्वसाधारणपणे मांसाहारी पदार्थांवरही बंदी घातली पाहिजे. तथापि, ईशान्येसह काही ठिकाणी, गोमांस खाणे अजूनही कायदेशीर आहे”. पुढे “जर तुम्ही तिथे खाल्ले तर ते यम्मी असते पण जर तुम्ही आमच्या उत्तर भारतात खाल्ले तर ते मम्मी असते”, असे विधान करत त्यांनी एक छोटासा विनोदही केला.

#WATCH | On Gujarat Government to introduce Uniform Civil Code after Uttarakhand Government, TMC MP Shatrughan Sinha says, "Implementation of UCC in Uttarakhand, is prima facie, commendable. UCC must be there in the country and I am sure everyone will agree with me. But there are… pic.twitter.com/9jWW0VhQkU

— ANI (@ANI) February 4, 2025

आणखी वाचा – “८-१० वर्षांनंतर मी आणि हर्ष निवृत्ती घेणार”, लाफ्टर क्वीन भारती सिंहचा मोठा खुलासा, म्हणाली, “पती-पत्नी म्हणून…”

शत्रुघ्न सिन्हा यांनी उत्तराखंडमध्ये यूसीसीच्या अंमलबजावणीबद्दल पुढे सांगितले आणि देशभरात त्याची अंमलबजावणी करण्यास पाठिंबा दिला. ते म्हणाले, “उत्तराखंडमध्ये यूसीसीची अंमलबजावणी कौतुकास्पद आहे. देशात यूसीसी निश्चितच लागू केले पाहिजे आणि मला खात्री आहे की सर्वजण माझ्याशी सहमत असतील. पण त्यात अनेक बारकावे आणि त्रुटी आहेत. म्हणूनच यूसीसी तरतुदींचा मसुदा तयार करण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक घेतली पाहिजे. या विषयावर प्रत्येकाचे मत आणि मते जाणून घेण्यासाठी त्यांचा सल्ला घेतला पाहिजे”.

आणखी वाचा – “लोक मला लेस्बियन म्हणायचे आणि…”, बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “खूप दबाव…”

दरम्यान, उत्तराखंड राज्याने २७ जानेवारीपासून राज्यात यूनिफॉर्म सिविल कोड लागू करून ऐतिहासिक पाऊल उचललं आहे. उत्तराखंडनंतर गुजरातमध्येही समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. गुजरातमध्ये UCC लागू करण्यासाठी ५ सदस्यीय समिती बनवण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश रंजना देसाई यांच्या नेतृत्वाखाली ही समिती असेल ती ४५ दिवसांत राज्य सरकारला त्यांचा अहवाल सादर करेल. या अहवालानंतर राज्यात UCC कायदा लागू करण्यावर शिक्कामोर्तब होईल.

Tags: shatrughan sinhaShatrughan Sinha demanded ban meatShatrughan Sinha demanded ban meat in India
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Mamta Kulkarni on fasting and drinking

"दिवसा उपवास आणि रात्री दारू पिऊन…" अध्यात्म धर्म स्वीकारणाऱ्या सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाल्या, "टॉयलेटमध्ये बसून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.