बालकवींच्या कवितेने सजणार फुलराणीचा अनोखा साज 

phulrani new song
phulrani new song

हिरवे हिरवे गार गालिचे,  हरित तृणांच्या मखमालीचे,
त्या सुंदर मखमालीवरती फुलराणीही खेळत होती(phulrani new song)

बालकवींची ही प्रसिद्ध कविता साऱ्या मराठी रसिकांच्या मनाचा नेहमीच ठाव घेते. आगामी ‘फुलराणी’ या मराठी चित्रपटातून ही अजरामर कविता गीतरूपाने आपल्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. दिग्दर्शक विश्वास जोशी दिग्दर्शित ‘फुलराणी’ आपल्यासमोर आणली असून या ‘फुलराणी’ चा अनोखा अंदाज २२ मार्चला रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटातील ‘विक्रम राजाध्यक्ष’ ही भूमिका अभिनेता सुबोध भावे तर कोळी आगरी ठसकेबाज अशी ‘शेवंता’च्या भूमिकेत अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर पाहायला मिळणार आहे. (phulrani new song)     

संगीतकार निलेश मोहरीर यांनी या कवितेला संगीत दिले असून गायक हृषिकेश रानडे आणि गायिका वैशाली सामंत यांच्या सुमधुर स्वरांनी या गाण्याला चारचाँद लागले आहे. गायक आणि गायिकेच्या अशा दोन्ही रूपात हे गीत ऐकता येणार आहे. ‘फिनक्राफ्ट मिडिया’ ‘अमृता फिल्म्स’ आणि ‘थर्ड एस एंटरटेन्मेंट’ने ‘फुलराणी… अविस्मरणीय प्रेम कहाणी’ या चित्रपटाची प्रस्तुती केली असून विश्वास जोशी, अमृता राव, श्वेता बापट चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. जाई जोशी, श्री.ए.राव, स्वानंद केळकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

====

हे देखील वाचा – ‘मी आणि निखिल खूप….’निखिल आणि स्नेहलच्या अफेरच्या चर्चांवर अखेर स्नेहल शिदमचं स्पष्टीकरण

====

या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले असून चित्रपटातील गीते बालकवी, गुरु ठाकूर, मंदार चोळकर यांची आहेत. तर चित्रपटाला संगीत निलेश मोहरीर आणि वरुण लिखाते यांनी दिले आहे. पार्श्वसंगीताची धुरा आदित्य बेडेकर याने सांभाळली आहे. अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, प्रियंका बर्वे, हृषिकेश रानडे, आनंदी जोशी, शरयू दाते यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.  छायांकन केदार गायकवाड तर संकलन गुरु पाटील आणि महेश किल्लेकर यांचे आहे. असोशिएट दिग्दर्शक म्हणून उत्कर्ष शिंदे तर मुख्य सहाय्यक दिग्दर्शक संतोष वाडेकर याने बाजू सांभाळली आहे.

२२ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात ‘फुलराणी’ चित्रपट प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.(phulrani new song)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Anibani
Read More

जून महिन्यापासून लागू होणार ‘आणीबाणी’ राजकारणावर परखड भाष्य करणारी कथा

हल्ली कोणत्याही गोष्टीची पार्श्वभूमी जाणून घ्यायची असेल तर चित्रपटांची कथानक रचली जातात. समाजातील कोणतीही घटना, गोष्ट असो त्यावर…
Prarthana Behere
Read More

प्रार्थना निघाली लंडनला,कुशलसोबत झळकणार चित्रपटात?

मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही सध्या तिच्या स्टायलिश अंदाज आणि तिच्या सहज सुंदर अभिनय कौशल्यामुळे नेहमी चर्चेत असते.…
vanita kharat rohit shetty
Read More

रोहित शेट्टी यांच्या चित्रपटात वनिता खरातची वर्णी

कोळीवाड्याची रेखा म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. वनिताने तिच्या विनोदी…
Satya Manjrekar controversy
Read More

‘वेडात मराठे वीर दौडले सात; चित्रपटात सत्या मांजरेकरच्या जागी या अभिनेत्याची एन्ट्री?

हल्ली छत्रपती शिवाजी महाराज आणि इतिहासातील शूर योद्धे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांचा सगळीकडे बोलबाला दिसत आहे. अनेक चित्रपट…
Lata Mangeshkar Maharashtra Shahir
Read More

महाराष्ट्र्र शाहीर या आगामी चित्रपटात गानकोकिळा लता मंगेश यांच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री

महाराष्ट्राला लाभलेल्या महान विभूतींपैकी एक ठरलेले व्यक्तिमत्व म्हणजे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे. ‘जय जय महाराष्ट्र माझा..’…