गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याला काजोलचा हिंदी बोलायला नकार, पापराजींवर भडकली, म्हणाली, “ज्याला जे समजायचंय…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 6, 2025 | 12:10 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kajol Troll

मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याला काजोलचा हिंदी बोलायला नकार, पापराजींवर भडकली, म्हणाली, "ज्याला जे समजायचंय…"

Kajol Troll : महाराष्ट्रात, विशेषत: मुंबईत मराठी व हिंदी भाषेचा वाद काही दिवसांपासून सुरु असलेला पाहायला मिळत आहे. शेवटच्या दिवसांत मुंबईतील अनेक हिंदी भाषिकांना मराठी बोलण्याची जबरदस्ती करण्यात आली, या प्रकरणावरून अनेक मारहाणीच्या घटनाही घडल्या. अनेक कलाकारांनी हिंदी आणि मराठी भाषेवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. अशातच आता अभिनेत्री काजोलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काजोल मराठीत बोलत आहे. जेव्हा तिला हिंदीमध्ये बोलण्यास सांगितले गेले तेव्हा काजोलने नकार दिला. यानंतर, मात्र तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत काजोलने मराठीत उत्तर दिले. जेव्हा पापराजींनी तिला हिंदीमध्ये बोलण्यास सांगितले तेव्हा तिला थोडा राग आला. ती भडकून म्हणाली, “आता मी हिंदीमध्ये बोलू का?. ज्याला जे समजायचंय ते समजू देत”. काजोलचे हे बोलणं अनेकांना खटकलं. अर्थात काजोल तिच्या मुद्द्यावर योग्य होती की, ६० आणि ६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात काजोलच मराठी बोलणं अगदी साहजिक होतं.

आणखी वाचा – अस्खलित मराठी बोलली, आईची साडी नेसून पुरस्कार स्वीकारला आणि…; वाढदिवसादिवशी काजोल भावुक, म्हणाली, “माझी आई…”

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

दरम्यान, काजोलच्या या वृत्तीमुळे नेटकरी खूष नाहीत. काही नेटकऱ्यांनी असेही म्हटले आहे की, “आपण मराठीमध्ये चित्रपट देखील तयार केले पाहिजेत. बॉलिवूड हिंदीमध्ये का करत आहात मग, फक्त मराठी करा”. एका वापरकर्त्याने आवाहन केले की, “सर्व हिंदी बोलणार्‍या लोकांनी त्यांचे चित्रपट पाहणे थांबवावे, तेव्हाच त्यांना कळेल”. त्याच वेळी, एका नेटकऱ्याने काजोलला सांगितले की, “तुम्हाला हिंदी प्रेक्षकांनीच घडवलं आहे”.

आणखी वाचा – दाक्षिणात्य सिनेविश्वाला मोठा धक्का, सुप्रसिद्ध अभिनेत्याचे ३४ व्या वर्षी निधन, कावीळ झाली आणि उपचारादरम्यानच…

काजोल सध्या ओटीटीवरील ‘सरजमीन’ नावाच्या चित्रपटात दिसत आहे. यामध्ये, दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन तिच्याबरोबर दिसला. यापूर्वी तिचा ‘माँ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

Tags: bollywood actresskajolKajol Troll
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Mumbai traffic issues

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा घोडबंदर रोडवर मनस्ताप, ट्रॅफिक, खड्ड्यांमध्ये हाल झाल्यानंतर काय केलं पाहा, म्हणाला, "जीव मुठीत घेऊन प्रवास…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.