ओटीटीवर दर आठवड्याला नवीन काहीतरी चित्रपट किंवा सिरिज प्रदर्शित होतंच असतात. ओटीटीवर अॅक्शन, ड्रामा, रोमान्स अशा सगळ्या आशयाचे नवीन चित्रपट किंवा वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. अशातच येत्या आठवड्यात ओटीटी वापरकर्त्यांसाठी चित्रपट व वेबसिरीजची पर्वणी असणार आहे. दर्जेदार विषयांमुळे त्याचबरोबर त्या विषयांमधील विविधतेमुळे ओटीटीवरील चित्रपट व सीरिजची मागणी गेल्या काही वर्षांत चांगलीच वाढली आहे. कारण या ओटीटीमुळे जगभरातून कुठलाही चित्रपट किंवा सीरिज अगदी सहजरीत्या घरी बसून पाहता येतात. हे नवीन चित्रपट आणि वेबसिरीज कोणत्या आहेत, जाणून घ्या…
पंचायत ३ : ‘पंचायत’च्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. या सीरिजचे आतापर्यंत दोन सीझन आले असून या दोनहे सीझनला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. अशातच आता या सीरिजचा नवीन सीझन येत्या २८ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. फुलेरा गावाची कथा, सरपंच, सचिव आणि बनराकस पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. यावेळी मंजू देवी निवडणूक लढवणार असून नवीन सचिव आल्याने जुन्या सचिवासाठी अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. ‘प्राइम व्हिडीओ’ या ओटीटी माध्यमावर ही सीरिज पाहता येऊ शकते.
इल्लीगल ३ : ‘इल्लीगल’ या वेब सीरिजच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांकडून प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर या सीरिजचा तिसरा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. येत्या २९ मे रोजी ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी माध्यमावर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. नेहा शर्मा, पियुष मिश्रा, अक्षय ओबेरॉय, नील भूपलम आणि सत्यदीप मिश्रा यांच्याशिवाय यात अनेक कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सीरिजचे पहिले दोन सीझन गाजल्यानंतर आता या सीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर : रणदीप हुड्डाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट चित्रपटगृहांनंतर ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. चित्रपटगृहामध्ये या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट हिंदीसह मराठीमध्येही प्रदर्शित झाला होता. ‘झी ५’ या ओटीटी माध्यमावर हा चित्रपट येत्या २८ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
एटलास : हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेझचा अमेरिकन सायन्स फिक्शन ॲक्शन थ्रिलर चित्रपट ‘एटलस’ नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. ब्रॅड पेटन दिग्दर्शित या चित्रपटात जेनिफर व्यतिरिक्त सिमू लिऊ, स्टर्लिंग के. ब्राउन, ग्रेगरी जेम्स कोहान, अब्राहम पॉप्युला, लाना पॅरिला आणि मार्क स्ट्राँग यांच्या भूमिका आहेत.