सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जयदीप अहलावतच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अभिनेत्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. अभिनेत्याच्या टीमने एक निवेदन जारी करून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यानुसार काल रात्री या अभिनेत्याच्या वडिलांचे मुंबईत निधन झाले. वृत्तानुसार, अभिनेत्याचे वडील दयानंद अहलावत यांचे अंत्यसंस्कार त्यांच्या हरियाणातील गावात केले जातील. (jaideep ahlawat father passed away)
जयदीप अहलावत यांच्या टीमने एका निवेदनाद्वारे असं म्हटलं आहे की, “जयदीप अहलावत यांच्या वडिलांच्या निधनाची घोषणा करताना आम्हाला खूप दुःख होत आहे. अभिनेता आता त्याच्या गावी रवाना झाला आहे. या कठीण काळात जयदीप आणि त्याच्या कुटुंबीयांनी आपली गोपनीयता राखण्याची विनंती केली आहे. तुमच्या समजूतदारपणाबद्दल आणि प्रार्थनेबद्दल तुमचे आभारी आहोत”.
आणखी वाचा – आई नाही पण मालिकेतील कलाकारांनीच थाटामाटात केलं डोहाळे जेवण ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीला अश्रू अनावर
जयदीप अहलावत यांचे वडील शिक्षक होते. तसंच त्यांची आईही शिक्षिका आहे. याबद्दल स्वतः अभिनेत्याने अनेक मुलाखतींमधून भाष्य केलं आहे. अभिनेत्याने असेही सांगितले होते की, ‘अभिनेता होण्याच्या स्वप्नात त्याच्या वडिलांनी त्याला खूप पाठिंबा दिला होता. आज ते ज्या स्थानावर आहेत ते त्यांच्या वडिलांच्या पाठिंब्यामुळेच शक्य झाले आहे’. जयदीप वडिलांना खूप घाबरत असे. मात्र तरीही ते त्यांच्यावर तितकेच प्रेम करत असे.
जयदीप यांनी आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. त्यांनी आजवर साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. मात्र ‘पाताल लोक’ या सीरिजमुळे अभिनेत्याच्या पसंतीत आणखी वाढ झाली. लवकरच तो ‘पाताल लोक’च्या दुसऱ्या सीझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे