Paatal Lok 2Teaser Out : २०२५च्या वर्षाची चांगली सुरुवात झाली आहे. प्राइम व्हिडीओने ‘पाताल लोक’च्या मोस्ट अवेटेड दुसऱ्या सीझनचा टीझर प्रदर्शित केला आहे. या सीझनबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि प्रत्येकजण पुन्हा एकदा इन्स्पेक्टर हाथी राम चौधरीच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. या वेबसीरिजचा पहिला सीझन सुपर डुपर हिट होता आणि आता सीझन २ ही हिट होण्याची शक्यता आहे. इन्स्पेक्टर हाथी राम चौधरीच्या भूमिकेतील जयदीप अहलावत एका नवीन प्रकरणाच्या तपासात व्यस्त असल्याचे टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. या वेळी सीझन २ मध्ये, दावे जास्त आहेत, रहस्ये खोल आहेत आणि सत्य उघड करण्यासाठीचे प्रयत्नही पाहायला मिळत आहेत.
टीझरच्या सुरुवातीला जयदीप अहलावत लिफ्टमध्ये दिसत आहे. यानंतर तो म्हणतो की, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एका गावात एक माणूस राहत होता. त्याला कीटकांचा प्रचंड तिरस्कार आहे, हे किडे सर्व वाईटाचे मूळ आहेत. मग एके दिवशी त्या माणसाच्या घराच्या कोपऱ्यातून एक किडा बाहेर आला आणि त्याने त्या माणसाला चावा घेतला”.
पुढे तो म्हणाला, “मग धाडसाने त्या माणसाने किडा मारला. मग तो माणूस हिरो झाला. संपूर्ण गाव त्याला मान देत असे. प्रत्येकजण आनंदी होता आणि पुढच्या अनेक रात्री सगळे शांतपणे झोपले”. यानंतर जयदीपच्या तोंडावर जखमेच्या खुणा दिसत आहेत आणि तो सांगतो की, एका रात्री त्याच्या पलंगाखाली काहीतरी सरकले. तिथे एक किडा होता. मग दहा किडे, हजार, लाख, कोटी आणि अगणित किडे. त्याला काय वाटले की त्याने एक कीटक मारला तर खेळ संपला, अंडरवर्ल्डमध्ये असे क्वचितच घडते.
अविनाश अरुण धवरे दिग्दर्शित, ‘पाताल लोक’ सीझन २ मध्ये जयदीप अहलावत, इश्वाक सिंग, गुल पनाग, तिलोत्तमा शोम, नागेश कुकुनूर आणि जाह्नू बरुआ सारखे दिग्गज कलाकार आहेत. पाताल लोक सीझन २ १७ जानेवारीपासून खास प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होईल.