‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, आदित्यच्या लग्नासाठी किर्लोस्करांकडे घाई सुरु असते आणि मॅरेज बिरो वाल्यांना काही मुलींचे फोटो घेऊनही बोलावलेलं असतं. दामिनी ही गोष्ट दिशाला फोन करुन सांगते आणि त्यावेळेला दिशा नवीन चाल आखते आणि दामिनीला सांगते की, त्या फोटोमध्ये पारूचा फोटो सुद्धा ठेव जेणेकरून पारुवर हा डाव उलटा पडेल. तर इकडे पारू नाराज असते आणि ती सतत लग्नाचाच विचार करत असते त्यावेळेला आदित्य तिच्याजवळ येतो आणि तिला समजावतो की, मी लवकरात लवकर तुझ्या देवी आईला सगळं काही खरं सांगणार आहे. (Paaru Serial Update)
दामिनी काकू तिथे आली आणि तिने खोटं सांगितलं म्हणून हे सगळं काही आम्हाला लपवून ठेवावे लागलं, पण मी लवकरात लवकर आणि योग्य ती वेळ साधत देवी आईसमोर सगळं काही सांगेन. त्यानंतर सावित्री आत्या पारू आणि आदित्यला बोलवायला येते. मॅरेज ब्युरो कडून माणसं आली आहेत सांगून ती आदित्यला घेऊन जाते. तेव्हा पारूला काळजी वाटू लागते की आता आदित्य सरांसाठी मुलगी बघायचा कार्यक्रम सुरु करणार आहेत मग माझ्या लग्नाचं काय होणार. मी तर हे लग्न मनापासून स्वीकारलं आहे. तर इकडे घरी आल्यावरही पारू किचनमध्ये काम करत असताना तिचं कुठेच लक्ष लागत नाही तर इकडे दामिनी मॅरेज ब्युरोच्या माणसांकडे फोटो पाहायला मागते आणि त्या फोटोमध्ये पारूचा फोटो घालते.
तितक्यातच तिथे अहिल्यादेवी वगैरे सगळेजण येतात तेव्हा दामिनी मुद्दाम विचारते मी इथे बसू का?, त्यानंतर त्यांना मॅरेज ब्युरोवाली एक एक करुन फोटो दाखवत असते तेव्हा पहिलाच फोटो अहिल्यादेवींना आवडतो त्यावेळेला मॅरेज ब्युरोवाली म्हणते की, ही तुमच्या घराण्याला शोभेल अशी मुलगी आहे. घरंदाज मुलगी असून ती सुशिक्षित आहे आणि संस्कारित देखील आहे. तसेच ती तुमच्याहून पाच पटीने श्रीमंत ही आहे. हे ऐकल्यावर दामिनी चिडते आणि म्हणते की तुम्ही श्रीमंतीचा माज आमच्यासमोर दाखवू नका तुम्हाला माहिती आहे का तुम्ही दामिनी किर्लोस्कर समोर श्रीमंतीचा माज दाखवत आहात त्यानंतर तिच्या लक्षात येते की, सगळेजण समोर बसलेले आहेत त्यावर ती शांत बसते. अहिल्यादेवी तिला ऐकवते की, ते आपल्यापेक्षा पाच पटीने श्रीमंत आहेत म्हणजे त्यांनी पाच पट जास्त कष्ट घेतले असतील त्यामुळे कोणाच्या कष्टावरून श्रीमंतीवरून बोलू नये. यावर दामिनी शांत बसते. तर मॅरेज ब्युरोवाली सांगते की, या फोटोत असलेल्या मुलीची मात्र एक अट आहे ती म्हणजेच ती मुलगी एकुलती एक असल्याने त्यांना नवरा मुलगा घर जावई हवा आहे.
यावर अहिल्यादेवी नकार देतात आणि सांगतात की माझा आदित्य घर जावई होऊ शकतच नाही, त्यानंतर दुसरा फोटो पाहत असतात मात्र त्यांना दुसरा फोटो आवडत नाही. तितक्यात तिसरा फोटो समोर येतो आणि तो पारूचा असतो. हे पाहून अहिल्यादेवींना खूप मोठा धक्का बसतो. त्या रागात त्या फोटोकडे पाहू लागतात. तेव्हा श्रीकांत म्हणतो कोणाचा फोटो आहे असं म्हणत तो फोटो हातात घेतो. पारूचा फोटो पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो त्यावर मॅरेज ब्युरो वाल्या म्हणतात की, ही खूप संस्कारी आणि जाईल त्या घरात लक्ष्मीच्या पावलाने जाईल अशी मुलगी आहे. मात्र हिची माहिती अद्याप माझ्यासमोर नाही. तितक्यात पारू सरबत घेऊन येते आणि ती पारूला पाहून म्हणते तू इथे. हे पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. त्यावर अहिल्यादेवी सांगतात की, ही आमच्या ड्रायव्हरची मुलगी आहे आणि ती इथे कामही करते. मला असं वाटलं होतं की, तुम्ही आमच्या घराण्याला शोभेल अशा मुली आमच्याकडे घेऊन याल मात्र तुम्ही तर आमच्या घराण्याला मिळत्या जुळत्या मुली आणलेल्या नाही आहेत. हे ऐकून पारूलाही वाईट वाटतं आता मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.