‘पारू’ मालिकेच्या नव्या भागात मोठं रंजक वळण लवकर येणार आहे. मालिकेत सध्या असं पाहायला मिळत आहे की, किर्लोस्कर काजळाच्या लोगोसाठी डोळ्यांचा शोध घेण्याचं काम सुरू असतं त्यावेळेलाच कॉन्फरन्समध्ये सगळेजण जमलेले असतात. तेव्हा तिथं काही शॉर्टलिस्ट केलेले डोळे दाखवले जातात. तेव्हा दिशाचे डोळे समोर येतात तेव्हा अहिल्यादेवी त्या डोळ्यांचा फोटो बाजूला काढून ठेवायला सांगतात, त्यानंतर पारूचे डोळे पुढे येतात, तेव्हा ते डोळे आदित्य अहिल्यादेवी सगळ्यांनाच आवडतात. (Paaru Serial Update)
सगळेजण त्या डोळ्यांचं कौतुक करतात. अहिल्यादेवी म्हणतात की, या डोळ्यात एक अशी चमक आहे जी इतर डोळ्यांत जाणवली नाही. हे डोळे इतके बोलके आहेत की हेच डोळे आपण आपल्या लोगोसाठी वापरणं योग्य आहे असं मला वाटतं. हे ऐकून दिशाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. त्यानंतर पारूचे डोळे लोगोसाठी वापरणार असं सांगून त्या निघून जातात. तर इकडे चरत चरत पारूची वैजू बंगल्यात येते आणि ती चुकून दिशाच्या पायाभोवती येते. तेव्हा दिशा त्या वैजूला घाबरून स्विमिंगपूल मध्येच पडते. सगळेचजण तिथे येतात तेव्हा जनावर आत आलं म्हणून ती घाबरून पडली असल्याचं सांगते. त्यानंतर अहिल्यादेवी सुरक्षारक्षकांना बोलावून जनावर आत कसं आलं असं म्हणून ओरडतात.
दिशा व दामिनी नक्की जनावर कोणाचं होतं याचा शोध घेण्यासाठी खोलीत येतात आणि सीसीटीव्ही फुटेज चेक करतात त्या वेळेला दिशाला गणि त्या वैजूला घेऊन जाताना दिसतो. तेव्हा दिशा म्हणते की, आपण या गोष्टीचा योग्य असा उपयोग करून पारूला अद्दल घडवली पाहिजे असं म्हणून त्या प्लॅन करतात. तर इकडे पारूला वैजू बंगल्यात आली आणि त्यामुळे दिशा मॅडम पाण्यात पडल्या आता हे सत्य सगळ्यांसमोर आलं तर वैजूला कायमचा तिच्यापासून दूर राहावं लागेल याची भीती वाटत असते.
तर आता एकीकडे पारूची ही भीती खरी ठरणार का?, आणि आता पारुचे डोळे सिलेक्ट झाल्यानंतर पारूला हे सत्य जेव्हा कळेल आणि इतरांनाही कळेल तेव्हा काय होणार?, हे सर्व पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.