‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे पारू झोपलेली असते तेव्हा अचानक मारुतीला जाग येते आणि त्याला पारूचा भास होतो म्हणून तो उठतो. तेवढ्यात पारू झोपायचं नाटक करते आणि पाहते की नक्की बा काय करत आहे, त्यावेळेला तिच्या गळ्यातलं मंगळसूत्रही दिसत असतं मात्र मारुतीचं त्याकडे लक्ष जात नाही आणि मारुती तिच्या अंगावर चादर घालून तिला झोपवतो तर इकडे आदित्यच्या पायाला दुखापत झालेली असते तेव्हा पारू तिच्या गावाकडचे काही उपाय करत असते तर दामिनीने याबाबतची माहिती आधीच अहिल्यादेवींना दिलेली असते आणि ती अहिल्यादेवींना आदित्यच्या रूममध्ये घेऊन येते. त्या पाठोपाठ दिशाही येते. (Paaru Serial Update)
पारूला हे सगळं करताना पाहून अहिल्यादेवी पारुला ओरडतात आणि सांगतात की, हे सगळं करणं तू थांबव. तर दिशाही तिथे येते आणि पारूला बोलते, हे सगळं करायला तू डॉक्टर आहे का?, तू डोक्यावर पडली आहेस का?, तर दामिनी म्हणते,आता तू आदित्यच्या पायाला हात लावला आहेस उद्या त्याच्या अजून जवळ जाण्याचा प्रयत्न करशील, हे ऐकून पारू खूप नाराज होते. तर अहिल्यादेवी पारूला आदेश देतात की, याच्यापुढे तू आदित्यच्या खोलीत पायसुद्धा ठेवायचा नाहीस आणि आताच्या आता तू घरी निघून जा, असं सांगतात. त्यानंतर पारूला खूपच वाईट वाटतं तर दामिनी आणि दिशाही पारूला खूप बोलतात.
आदित्य त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो मात्र त्या काही समजून घेत नाही आणि पारू तिथून निघून जाते. तर पारू बाहेर येऊन जास्वंदाच्या तिच्या रोपट्याबरोबर मनातलं सगळं काही बोलत असते हे दिशा पाहते आणि त्यानंतर दिशा त्या रोपट्यालाच किर्लोस्कर वाड्यातून बाहेर फेकलं पाहिजे असं ठरवते. आणि अहिल्यादेवींच्या रूममध्ये जाऊन अहिल्यादेवींना सांगते की, बागेतील काही रोपट्यांना कीड लागली आहे त्यामुळे मी क्लिनिंग करायचा निर्णय घेतला आहे, असं सांगून ती क्लिनिंग करायला जाते. त्यावेळेला अहिल्यादेवी आणि श्रीकांत बोलत असतात. तेव्हा श्रीकांत सांगतो की, पारू सारखी आपल्याला एक मुलगी हवी होती. पारू या घराचा आत्मा आहे. तिने कशी सगळ्यांची नस एकदम ओळखून ठेवली आहे, मात्र पारूचं केलेलं कौतुक अहिल्यादेवींना काही जास्त पटत नाही. सासरी गेल्यावर या घरात पारूची कमतरता भासेल असेही श्रीकांत म्हणतो. अहिल्यादेवी म्हणतात की, पण ती आपली रीतच आहे शेवटी सासरी लग्न होऊन मुलीला जावंच लागतं. मात्र ती मारुतीकडे आली की आपण तिला भेटत जाऊ. त्यानंतर दिशा जाऊन ते रोपटं काढते. हे गणी येऊन पारुला सांगतो आणि पारू ते पाहून खूप रडत असते. पारू सांगते की, माझ्या चुकीची शिक्षा या रोपट्याला कशाला दिली.
यावरुन दिशा आणि पारू यांच्यात वादही होतात. त्यावेळेला गणी रोपटं दिशानेच काढलं म्हणून तिच्यावर ओरडू लागतो आणि तिच्या अंगावर धावून जातो मात्र दिशा गणीच्या कानशिलात लगावते. त्यावेळेला पारूचा संताप होतो आणि पारू म्हणते की, आम्हालासुद्धा तुमच्या भाषेत उत्तर देता येतं. इतक्यातच अहिल्यादेवी मागून येतात आणि पारुला जोरात आवाज देतात. आता अहिल्यादेवी पारुची बाजू समजून घेण्याऐवजी दिशाची बाजू घेऊन पारुला शिक्षा करणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.