paaru serial new twist : मालिकाविश्वात रोज नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांसमोर येत असतात, आणि त्यामुळेच प्रेक्षकांचं या मालिकांवरील प्रेम दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिका प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी ठरल्या आहेत. त्यातच सध्या चर्चेत असलेली ‘पारू’ ही मालिका तिच्या अनोख्या कथानकामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. या मालिकेत पारू-आदित्यची जोडी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवत आहे. नुकताच प्रदर्शित झालेला मालिकेचा नवा प्रोमो तर चर्चेचा विषय ठरला आहे. कारण या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना एक धाडसी आणि वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळत आहे.
सध्या मालिकेत अहिल्या, आदित्यचं लग्न साजिरीबरोबर लावते. पण आदित्य मनाने अजिबात तयार नसतो, कारण त्याचं खरं प्रेम पारूवरच असतं. आणि ऐन साखरपुड्यादिवशी अहिल्यादेवींसमोर आदित्य-पारूच्या प्रेमाचं सत्य येत हे ऐकून त्यांना खूप मोठा धक्का बसतो. आदित्य-पारू यांच्यातील नातं अहिल्यादेवीला मान्य नसल्यामुळे ती संतापून आदित्य-पारूला घराबाहेर काढते.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये आदित्य आणि पारू किर्लोस्कर घराच्या गेटबाहेर उभे असतात. आदित्य फार दुखावलेला दिसतो, पण तरीही तो पारूसमोर आपल्या भावना व्यक्त करतो, “चल पारू आजपासून आपल्याला आपला संसार सुरू करायचा आहे”. यावर पारू आदित्यला म्हणते “आदित्य सर देवी आईंना अभिमान वाटेल असच काम करूया”. आदित्यचं पारू वरील प्रेम इतकं प्रबळ असतं की तो तिचं काहीच ऐकत नाही आणि तिचा हात धरून तिला घेऊन गेटबाहेर निघतो.
आणखी वाचा – संसाराची १३ वर्ष, मुलं न होऊ देण्याचा निर्णय अन्…; लीना भागवत व मंगेश कदम यांचा मोठा खुलासा, म्हणाले…
यातून मालिकेत आदित्य-पारूच्या संसाराची एक नवी सुरुवात होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. हा ट्विस्ट पाहून प्रेक्षकांनी सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी अखेर आदित्य-पारूची जोडी एकत्र पाहून आनंद व्यक्त केला आहे.आता पुढच्या भागात या दोघांच्या संसाराचा प्रवास कसा रंगतो, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये चांगलीच वाढली आहे. पुढे कोणते नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळणार हे पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे.





