‘पारू’ या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची पसंती मिळवली. या मालिकेचं कथानक पारू या पात्राभोवती फिरताना दिसत आहे. पारू ही भूमिका अभिनेत्री शरयू सोनावणे साकारताना दिसत आहे. मालिकेतील शरयूच्या भूमिकेला म्हणजेच पारूला विशेष पसंती मिळत आहे. शरयूने आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. याआधीही शरयू अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. (Sharayu Sonawane)
सोशल मीडियावर पारू बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. पारू तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन नेहमीच ट्रेंडिंग रील व्हिडीओवर थिरकतानाचे अनेक व्हिडीओही शेअर करते. मालिकाविश्वात सक्रिय असलेली पारू तिच्या खऱ्या आयुष्यामुळे चर्चेत आली. अभिनेत्रीने लग्नाला थेट एक वर्ष पूर्ण होताच त्यांच्या लग्नाची जाहीर कबुली दिली. शरयूच्या लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला.
वर्षभरापूर्वीच शरयूने निर्माता जयंत लाडेसह लग्नगाठ बांधली. वर्षभर दोघांनी त्यांच्या या लग्नाबाबत गुपित ठेवलं होतं. लग्नाला वर्ष होताच त्यांनी लग्नाची जाहीर बातमी चाहत्यांसह शेअर केली. शरयू सध्या चित्रीकरणामुळे सातारा येथे आहे. मात्र चित्रीकरणाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत ती नेहमीच तिच्या पतीसह वेळ घालवताना दिसते. अशातच शरयू सध्या तिच्या नवऱ्यासह देवदर्शनाला गेली आहे. आषाढी एकादशीचे निमित्त साधत शरयू व जयंत यांनी विठुरायाचे दर्शन घेतले आहे.
थेट पंढरपूरला जात शरयूने तिच्या नवऱ्याबरोबर विठुरायाचे दर्शन घेतले आहे. यावेळी तिने पारंपरिक अंदाजात हजेरी लावलेली पाहायला मिळाली. लग्नानंतर ही जोडी सध्या देवदर्शन करत आहे. तर शरयूच्या या देवदर्शनाच्या फोटोंना प्रेक्षकांनी पंसती दर्शविलेली पाहायला मिळत आहे. शरयूने निर्माता जयंत लादेसह लग्नगाठ बांधली आहे. याआधी शरयू व जयंत यांच्या साखरपुड्याची चर्चा झाली होती. त्यावेळेला तिने सोशल मीडियाद्वारे साखरपुडा उरकल्याची बातमी शेअर केली होती. मात्र त्यानंतर अभिनेत्रीने लग्नाची कोणतीच बातमी सोशल मीडियाद्वारे शेअर केली नाही. थेट लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच शरयूने तिच्या लग्नाचे फोटो चाहत्यांसह शेअर करत ही आनंदाची बातमी सांगितली.